पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:58 IST2021-01-13T04:58:33+5:302021-01-13T04:58:33+5:30

कोल्हापूर : जुना वाशीनाका मार्गावर पूर्ववैमनस्यातून केलेल्या चाकूहल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. शुभम गजानन पोवार (वय २३, रा. शिवाजी ...

A knife attack on a young man out of prejudice | पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकू हल्ला

पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकू हल्ला

कोल्हापूर : जुना वाशीनाका मार्गावर पूर्ववैमनस्यातून केलेल्या चाकूहल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. शुभम गजानन पोवार (वय २३, रा. शिवाजी पेठ, खंडोबा तालीमनजीक) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी कृष्णात पाटील, अमित उर्फ सोन्या पाटील, शुभम चौगुले (सर्व रा. शिवाजी पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

शुभम पोवार हा दुचाकीवरुन आपल्या घरी जात असताना कृष्णात पाटील याने त्याला अडवले व जुना वाद उकरुन काढत ‘तु पुन्हा आमच्या गल्लीत फिरकायचे नाही, नाहीतर तुझ्या मामालाच संपवतो’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर अमित पाटील याने रागाच्या भरातच शुभम याला दुचाकीवरुन खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर शुभम चौगुले याने त्याच्यावर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात शुभम पोवार याच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्याला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A knife attack on a young man out of prejudice