मोहिते कॉलनीत भावावर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:39 IST2021-05-05T04:39:19+5:302021-05-05T04:39:19+5:30
कोल्हापूर : घरगुती कारणांवरून सख्ख्या भावावर चाकू हल्ला करून त्यांना जखमी करण्याचा प्रकार मोहिते कॉलनी येथे सोमवारी रात्री उशीर ...

मोहिते कॉलनीत भावावर चाकू हल्ला
कोल्हापूर : घरगुती कारणांवरून सख्ख्या भावावर चाकू हल्ला करून त्यांना जखमी करण्याचा प्रकार मोहिते कॉलनी येथे सोमवारी रात्री उशीर घडला. या हल्ल्यात बशीर अझीज शेख (रा. मोहिते कॉलनी) असे जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बशीर अझीझ शेख हे मोहिते कॉलनी येथे राहत असून त्यांचा भाऊ रशीद शेख हे कदमवाडी येथे राहतो. सोमवारी रात्री घरगुती कारणांवरून जाब विचारण्यासाठी रशीद शेख कदमवाडी येथे आले. त्यावेळी त्याने भावाला घराबाहेर बोलवून त्याच्याशी वादावादी केली. वाद वाढत गेला अन् रशीदने केलेल्या चाकू हल्ल्यात बशीर जखमी झाले. त्यांच्या हातावर, गळ्यावर, गालावर जखमा झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जखमीची पत्नी रेहाना शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून शाहुपुरी पोलीस ठाण्यात रशीर शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला.