केएमटी घेणार चार सीएनजी बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:22 IST2021-03-25T04:22:36+5:302021-03-25T04:22:36+5:30
कोल्हापूर : नवीन चार सीएनजी बसेस खरेदी करण्यासह सीएनजी पंप, सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देणारा महानगरपालिका परिवहन विभागाचे नवीन ...

केएमटी घेणार चार सीएनजी बसेस
कोल्हापूर : नवीन चार सीएनजी बसेस खरेदी करण्यासह सीएनजी पंप, सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देणारा महानगरपालिका परिवहन विभागाचे नवीन वर्षाचे अंदाजपत्रक बुधवारी मंजूर करण्यात आले.
के. एम.टी. उपक्रमाचा सन २०२१-२०२२ चा जमाखर्चाचा महसुली एक लाख २८ हजार १०० रुपयांचा शिलकीचा अंदाजपत्रकीय आराखडा प्रशासकीय समितीकडे मान्यतेसाठी सहायक आयुक्त चेतन कोंडे यांनी सादर केला. नवीन अंदाजपत्रकीय आराखड्यामध्ये महसुली जमा ७१ काेटी १९ लाख ८० हजार १०० रुपये आणि महसुली खर्च ७१ कोटी १८ लाख ५२ हजार दाखविण्यात आला आहे. नवीन अंदाजपत्रकीय आराखड्यात महापालिकेकडून महसुली खर्चासाठी अर्थसाहाय्य म्हणून १४ कोटी भांडवली खर्चासाठी ५० लाख अशी तरतूद करण्यात आली आहे.
- केएमटी अंदाजपत्रकातील नावीन्यपूर्ण योजना-
- के.एम.टी. / के.एम.सी. वाहनांसाठी सीएनजी पंप उभा करणे - ५० लाख
- सध्याचे ई-तिकिटिंग व आरएफआयडी पासेस सिस्टीम अद्ययावत करणे, मोबाईल ॲपद्वारे डिजिटल तिकीट, पासेस, पेमेंट सुविधा, जीपीएस, व्हीटीएस, पीआयएस सिस्टीम करणे - ७५ लाख
- महिला व विद्यार्थ्यांसाठी चार मिनी सीएनजी बसेस आमदार निधी व महिला व बालकल्याण समितीमार्फत खरेदी करणे - एक कोटी
- मुख्य यंत्रशाळा येथे अनुदानातून महाऊर्जामार्फत सौरउर्जा प्रकल्प राबविणे - १५ लाख
- ‘मेडा’मार्फत प्राप्त अनुदानातून ऊर्जा संवर्धन प्रकल्प राबविणे - ९ लाख
- बसमध्ये एलईडी टीव्ही व एफएम सुविधेद्वारे प्रवासी मनोरंजन करणे - १२ लाख
- जोतिबा, पन्हाळा बससेवा कोल्हापूर दर्शन व विमानतळ येथे आधुनिक बसद्वारे सेवा सुरू करणे.
- व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा येथून अंबाबाई मंदिर येथे पर्यटकांसाठी शटल सर्व्हिस बससेवा सुरू करणे.