शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील केएमटी १६ एप्रिलनंतर बंद पाडणार, कोल्हापूर हद्दवाढ कृती समितीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:25 IST

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावातील केएमटीची बससेवा दि. १६ एप्रिलपूर्वी बंद करावी अन्यथा कृती समितीमार्फत बंद पाडू, ...

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावातील केएमटीची बससेवा दि. १६ एप्रिलपूर्वी बंद करावी अन्यथा कृती समितीमार्फत बंद पाडू, असा इशारा सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने मंगळवारी महानगरपालिका प्रशासनाला दिला. शहरालगतच्या गावांना बससेवा देण्यासाठी वर्षाला २० कोटी रुपये इतका खर्च होतो. शहरवासीयांच्या करातून होणारा हा निधी शहराच्या सुधारणेवर खर्च करावा, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.हद्दवाढ कृती समितीचे शिष्टमंडळ मंगळवारी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना भेटण्यासाठी महापालिकेत गेले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलाविलेल्या बैठकीत हद्दवाढीसंदर्भात काय चर्चा झाली, प्रशासक म्हणून काय बाजू मांडली याची विचारणा कृती समितीने प्रशासकांकडे केली. त्यावेळी प्रशासकांनी बैठकीची माहिती दिली.पहिल्या दिवशी बैठक झाली नाही, दुसऱ्या दिवशीही उपमुख्यमंत्री बैठकीला आले नाहीत; परंतु स्थानिक आमदारांनी तसेच अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना महिती दिली. त्यावेळी मी तेथे नव्हते. त्यामुळे त्यावेळी काय चर्चा झाली मला माहीत नाही; परंतु हद्दवाढ निर्णयप्रक्रियेत असणाऱ्या नगरविकास विभागाच्या दोन्ही सचिवांना शहराची हद्दवाढ का होणे आवश्यक आहे, हे पटवून दिले असल्याचे मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.त्यानंतर बाबा इंदूलकर यांनी शहराच्या हद्दवाढीस विरोध करणाऱ्या ग्रामीण भागातील ‘केएमटी’ची बससेवा तत्काळ बंद करावी, अशी मागणी केली. केएमटी ग्रामीण भागातील २१ मार्गांवर बससेवा देत आहे. या सेवेसाठी महापालिका वर्षाला २० कोटी रुपये खर्च करत आहे. जर त्यांना शहरात यायचे नसेल तर केएमटीची बससेवा आपण का द्यावी. ती बंद करा आणि त्यांच्या सेवेवर होणारा २० कोटींचा निधी शहरातील विकासकामांवर खर्च करावा, अशी सूचना इंदूलकर यांनी केली.आमच्या कराचे पैसे ग्रामीण सेवेवर न करता शहरातील सेवेवर करावेत, अशी सूचना करताना दिलीप देसाई यांनी आपले कर्तव्य नसताना दुसऱ्यांसाठी आमच्या कराचे पैसे खर्च करणे हा निधीचा गैरवापर आहे, असा आरोप केला.

सरकारच्या निर्णयाची वाट पाहा - प्रशासकहद्दवाढीबाबत महापालिकेने ठोस भूमिका मांडलेली आहे. राज्य सरकार यावर निर्णय घेईल असे वाटते, तोपर्यंत आपण वाट पाहूया, अशी विनंती प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी केली. केएमटीची सेवा खंडित करता येऊ शकते का? याची कायदेशीर माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी सांगितले.यावेळी आर. के. पोवार, महेश जाधव, सुजित चव्हाण, बाबा पार्टे, चंद्रकांत यादव, अनिल चव्हाण, अशोक भंडारे, वैशाली महाडिक, पद्मा तिवले, शुभांगी साखरे, नीलिमा व्हटकर, अनिल घाडगे, महादेव पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर