के.एम.ए. मध्ये राज्यस्तरीय अविष्कार उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:22 IST2020-12-29T04:22:49+5:302020-12-29T04:22:49+5:30

कोल्हापूर : इंडियन मेडिकल असोसिएशन (नाशिक) प्रस्तुत अविष्कार हा राज्यस्तरीय ऑनलाईन सांस्कृतिक कार्यक्रम (के.एम.ए.) कोल्हापूर शाखेतर्फे मोठ्या उत्साहात ...

K.M.A. In celebration of state-level innovation enthusiasm | के.एम.ए. मध्ये राज्यस्तरीय अविष्कार उत्साहात साजरा

के.एम.ए. मध्ये राज्यस्तरीय अविष्कार उत्साहात साजरा

कोल्हापूर : इंडियन मेडिकल असोसिएशन (नाशिक) प्रस्तुत अविष्कार हा राज्यस्तरीय ऑनलाईन सांस्कृतिक कार्यक्रम (के.एम.ए.) कोल्हापूर शाखेतर्फे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डाॅ. ए. एम. शिर्के यांच्या हस्ते झाले.

ऑनलाईन पद्धतीने राज्यासह सातासमुद्रापार झालेल्या या कार्यक्रमात कोल्हापुरातील डाॅ. उन्नती सबनीस, डाॅ. अजित कुलकर्णी, डाॅ. मनिषी नागांवकर, डाॅ. रुपा नागावकर, डाॅ. शरद भुताडिया, डाॅ. अरुण धुमाळे, डाॅ. अनिता परितेकर, डाॅ. अरुण देशमुख, डाॅ. सोपान चौगुले, डाॅ. संजय घोटणे, डाॅ. राजेंद्र वायचळ, डाॅ. पी. एम. समुद्रे व डाॅ,. सोपान चौगुले यांनी नकलांसह विविध कलाविष्कार सादर केला. तर महाराष्ट्राची लोकधारा यावर डाॅ. आशा जाधव, डाॅ. रुपाली दळवी, डाॅ. प्रिया शहा, डाॅ. गायत्री होशिंग, डाॅ. महेश दळवी, डाॅ. मिनाक्षी काळे, डाॅ. प्रिती चिंचणीकर यांनी नृत्यांचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. अमर अडके व डाॅ. मंजिरी वायचळ यांनी केले. संस्थेच्या मानद सचिव डाॅ. गीता पिल्लाई, खजानीस डाॅ. शितल देसाई, समन्वयक डाॅ. पी. एम. चौगुले, डाॅ. रवींद्र शिंदे आदी उपस्थित होते.

फोटो : २८१२२०२०-कोल- के.एम.ए.

ओळी : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे ऑनलाईन आयोजित केलेल्या अविष्कार सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डाॅ. ए. एम. शिर्के यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाले.

Web Title: K.M.A. In celebration of state-level innovation enthusiasm