केव्हीज झकास बाकी भकास ..

By Admin | Updated: March 11, 2015 00:32 IST2015-03-11T00:16:49+5:302015-03-11T00:32:09+5:30

नागाळा पार्क : सेंट झेव्हियर्स स्कूलच्या पाठीमागील रस्त्यांची चाळण; कचरा उठावाची प्रतीक्षा

Kiwis flashes with rest .. | केव्हीज झकास बाकी भकास ..

केव्हीज झकास बाकी भकास ..

.कोल्हापूर : शहरातील उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेला भाग म्हणून नागाळा पार्कची ओळख आहे. शासकीय कार्यालये, नामांकित हॉस्पिटल्स् आणि शिक्षणसंस्था या प्रभागामध्ये आहे. या प्रभागात नगरसेविका राहत असलेल्या ‘केव्हीज पार्क’मधील अंतर्गत रस्ते, गटारी, चॅनेल्सची बहुतांशी कामे झाली आहेत पण वारणा कॉलनी परिसर, आरटीओ कार्यालय, सेंट झेव्हियर्सची मागील बाजूच्या परिसरातील रस्त्यांची चाळण झाली झाली आहे. नगरसेविका लीला धुमाळ यांनी पहिल्याच टर्ममध्ये सुमारे पासष्ट लाखांचे रस्ते केल्याचा दावा केला. विवेकानंद कॉलेज ते जिल्हा परिषदेपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. वारणा कॉलनी ते मेरी वेदर ग्राऊंड हा साडेचार लाख रुपयांचा डांबरी रस्ता करण्यात आला आहे. याशिवाय नागेश्वर बंगला ते म्हाडा कॉलनी, एलआयसी कार्यालय ते तक्षक अपार्टमेंट, विवेकानंद कॉलेज ते यश रेसिडेन्सी या डांबरी रस्त्यांची कामे झाली आहेत. केव्हीज पार्क येथे गेल्या पाच वर्षांत २४ लाखांचे रस्ते करण्यात आले आहेत, पण वारणा कॉलनीकडून सेंट झेवियर्सकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. तशीच परिस्थिती विवेकानंद कॉलेज ते वारणा कॉलनी या रस्त्याची आहे.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून मिळालेले दहा लाख रुपये आणि माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांच्या सहकार्यातून मिळालेले पाच लाख रुपये तसेच महानगरपालिकेकडील ९ लाख अशा एकूण पंचवीस लाखांची कामे केव्हीज पार्कमध्ये करण्यात आली आहेत. या निधीतून विशाळगडकर कॉलनीतील गार्डनमध्ये पाच लाख रुपयांचे पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले आहेत, तर उर्वरित रकमेतून अंर्तगत डांबरी रस्ते करण्यात आले आहेत. याशिवाय वक्रतुंड मोटर्स ते नागोबा देवालय, हिंदू कॉलनी, विशाळगडकर कॉलनीत डांबरी रस्ते तयार करण्यात आले आहेत. केव्हीज पार्कमधील ड्रेनेजची बहुतांशी कामे झालेली आहेत. केशर कस्तुरी ते विक्रमसिंह घाटगे यांच्या बंगल्याकडे जाणारे ८ लाख ३३ हजार रुपयांची कामे करण्यात आली आहेत. याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला ते मधुकुंज अपार्टमेंट, विवेकानंद कॉलेज ते वारणा कॉलनी आणि पल्लवी अपार्टमेंट ते विक्रमसिंह घाटगे सरकार बंगला या रस्त्यासाठी दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत. याशिवाय एस्तर पॅटर्न स्कूलसाठी साडेसहा लाख रुपयांची संरक्षक भिंत, महाराष्ट्र उद्यान येथे २ लाखांची खेळणी, वारणा कॉलनी येथील मैदानासाठी १ लाख वीस हजार रुपयांची खेळणी ही कामे करण्यात आली आहेत.

Web Title: Kiwis flashes with rest ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.