शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी किशोरी पसारे, सचिवपदी अमित भिसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 19:51 IST

शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी कोल्हापुरातील कमला महाविद्यालयाची विद्यार्थीनी किशोरी पसारे हिची, तर सचिवपदी साताऱ्याच्या आझाद कॉलेज आॅफ एज्युकेशनचा विद्यार्थी अमित भिसे याची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. दोन वर्षांनंतर विद्यार्थी कल्याण मंडळाच्या निवडणूका झाल्या आहेत.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी किशोरी पसारे, सचिवपदी अमित भिसेबिनविरोध निवडी; शिवाजी विद्यापीठात जल्लोष

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी कोल्हापुरातील कमला महाविद्यालयाची विद्यार्थीनी किशोरी पसारे हिची, तर सचिवपदी साताऱ्याच्या आझाद कॉलेज आॅफ एज्युकेशनचा विद्यार्थी अमित भिसे याची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. दोन वर्षांनंतर विद्यार्थी कल्याण मंडळाच्या निवडणूका झाल्या आहेत.किशोरी पसारे

विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्ष आणि सचिवपदासाठीच्या सन २०१७-१८ च्या निवडणुकीची अधिसूचना फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जारी करण्यात आली. ही निवडणूक मंगळवारी झाली. या मंडळाच्या अध्यक्षपदासाठी न्यू कॉलेजचा सचिव अभिषेक श्रीराम आणि कमला महाविद्यालयाच्या किशोरी पसारे इच्छुक होते.

अमित भिसे

हे दोघे शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीशी संबंधित असल्याने अध्यक्षपदाची निवड बिनविरोध व्हावी याउद्देशाने अभिषेक याने माघार घेतली. त्यामुळे किशोरी हिची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली.

सचिवपदासाठी कराड येथील मंगलाताई जगताप महिला महाविद्यालयाची नम्रता काटवटे, पलूस येथील आर्ट सायन्स व कॉमर्स कॉलेजची शुभांगी नलवडे, सातारा येथील इस्मामसाहेब मुल्ला लॉ कॉलेजचा विशाल मांडरे आणि आझाद कॉलेज आॅफ एज्युकेशन अमित भिसे यांनी अर्ज दाखल केले. यातील नम्रता, शुभांगी आणि विशाल यांनी माघार घेतल्याने अमितची बिनविरोध निवड झाली.प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी ग्रंथ भेट प्रदान करून किशोरी आणि अमित यांचा सत्कार केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विद्यार्थी कल्याण मंडळाचे समन्वयक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी काम पाहिले. निवडीनंतर किशोरी आणि अमित यांचे समर्थक, मित्र-मैत्रिणींनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

दरम्यान, अध्यक्षपदी निवड झालेली किशोरी पसारे सध्या कमला महविद्यालयात एम.ए. योगा अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. माजी नगरसेवक राजू पसारे यांची ती कन्या आहे. तिने सन २००९ मध्ये कमला महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थीनींचा ‘डी. एम.’ ग्रुप स्थापन केला असून त्याद्वारे ती सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.

 

सचिवपदी निवड झालेला अमित भिसे हा आझाद कॉलेज आॅफ एज्युकेशनमध्ये बी. एड. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. त्याचे मूळ गाव निढळ (ता. खटाव) आहे. त्याचे वडील शेतकरी, तर आई गृहिणी आहेत. त्याने बी. एस्सी. अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक पटकविला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाची त्याला रँक होल्डर शिष्यवृत्ती मिळाली आहे. 

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक