शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत शिक्षक गटात विद्यापीठ विकास आघाडी, ‘सुटा’ची अभ्यास मंडळावर बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 06:57 PM2017-11-20T18:57:52+5:302017-11-20T19:05:19+5:30

शिवाजी विद्यापीठाची शैक्षणिक आणि व्यवस्थापकीय धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करणाºया अधिसभा व अन्य अधिकार मंडळांच्या निवडणुकीतील अभ्यास मंडळ गटात (बीओएस) सोमवारी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा)ने बाजी मारली. विद्यापीठ शिक्षक गटात विद्यापीठ विकास आघाडी भारी ठरली.

In the Shivaji University supremacy elections, the university's development front, 'Sutah' study group, in the teachers' group, | शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत शिक्षक गटात विद्यापीठ विकास आघाडी, ‘सुटा’ची अभ्यास मंडळावर बाजी

कोल्हापुरात सोमवारी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीतील मतमोजणीची प्रक्रिया विद्यापीठातील परीक्षा भवन क्रमांक दोनमध्ये राबविण्यात आली. (छाया : नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यापीठ शिक्षक गटात विकास आघाडी ‘भारी’चिठ्ठी, फेरमतमोजणीतून विजयी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची शैक्षणिक आणि व्यवस्थापकीय धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करणाऱ्या अधिसभा व अन्य अधिकार मंडळांच्या निवडणुकीतील अभ्यास मंडळ गटात (बीओएस) सोमवारी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा)ने बाजी मारली. विद्यापीठ शिक्षक गटात विद्यापीठ विकास आघाडी भारी ठरली.


विद्यापीठातील परीक्षा भवन क्रमांक दोनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया झाली. विद्यापीठ शिक्षक गटात विद्यापीठ विकास आघाडीच्या भारती पाटील (९७ मते), सागर डेळेकर (९५) आणि विकास मंचचे एन. बी. गायकवाड (१००) यांनी बाजी मारली. या गटात आघाडी आणि विकास मंच यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली.

विषयनिहाय ‘बीओएस’मधील विजयी उमेदवार (कंसात मते, संघटना): गणित - दिलीप हसबे (३), नवनीत सांगले (५ आघाडी), हंबीरराव दिंडे (५ सुटा). व्यवस्थापन - दत्तात्रय चवरे, शंकर सारंग (५, आघाडी), रवींद्र तेली (७ सुटा). मायक्रो बायोलॉजी - एच. व्ही. देशमुख (३ आघाडी), ए. आर. जाधव, एस. एस. सुपणेकर (३ सुटा). भौतिकशास्त्र - एम. एम. कारंजकर (९), व्ही. व्ही. किल्लेदार (११), किसन मोहिते (८ सुटा). वनस्पतीशास्त्र - वनिता कारंडे, महेंद्र वाघमारे (९ आघाडी), अशोक सादळे (७ सुटा). व्यावसायिक अर्थशास्त्र - विजय कुंभार (७), उदय माळकर (१४ आघाडी), बाळासाहेब माने (९ सुटा). मराठी - अरुण शिंदे (२४), उदय जाधव (१९ सुटा), दत्तात्रय पाटील (२२ अपक्ष). हिंदी - एस. बी. बनसोडे (२० अपक्ष), संजय चिंदगे (२०), एकनाथ पाटील (१९ सुटा). प्राणीशास्त्र - विश्वनाथ देशपांडे (६), सुरेश खाबडे (९ आघाडी), सत्यवान पाटील (६ सुटा). रसायनशास्त्र, केमिकल इंजिनिअरिंग - सी. पी. माने (११), संजय पोरे (१४ आघाडी), रंजन कांबळे (१३ सुटा). वाणिज्य - सोनाप्पा गोरल (१० आघाडी), शिवाजी पोवार (१३), उदयकुमार शिंदे (१४ सुटा). भूगर्भशास्त्र - भूगोल- श्रीकृष्ण गायकवाड (१२), विनोद वीर (१३, अपक्ष), बाळासाहेब जाधव (१३, आघाडी). इंग्रजी- एस. बी. भांबर (२८), एन. पी. खवरे (२५ आघाडी), आर. एस. पोंडे (२० सुटा). इतिहास - एन. ए. वरेकर (३५), एस. एम. चव्हाण (२३), आर. डी. निकम (१८ सुटा). अर्थशास्त्र - एस. एम. भोसले (२५, आघाडी), व्ही. बी. देसाई (२५), व्ही. ए. पाटील (२२, सुटा). ‘बीओएस’मध्ये ‘सुटा’ला २१, आघाडीला २०, तर अपक्षांना चार जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ‘बीओएस’मध्ये आघाडी जोरदार मुसंडी मारली आहे.

चिठ्ठी, फेरमतमोजणीतून विजयी

अभ्यास मंडळातील गणित विषयाच्या गटात ‘सुटा’चे जनार्दन यादव आणि विकास आघाडीचे दिलीप हसबे यांना समान तीन मते पडली. यावर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात हसबे विजयी झाले.

प्राणीशास्त्र गटात देखील एस. ए. मांजरे आणि सत्यवान पाटील यांना समान ६ मते मिळाली. त्यात चिठ्ठीद्वारे पाटील विजयी ठरले. कॉमर्स गटात सोनाप्पा गोरल यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यात ते विजयी झाले. दरम्यान, सुटा कोल्हापूरचे सहकार्यवाह आर. जी. कोरबू यांचा व्यावसायिक अर्थशास्त्र गटात पराभव झाला.

 

 

Web Title: In the Shivaji University supremacy elections, the university's development front, 'Sutah' study group, in the teachers' group,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.