‘ईशरे’च्या कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी किसन लालवाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:24 IST2021-04-16T04:24:47+5:302021-04-16T04:24:47+5:30
अन्य कार्यकारिणीमध्ये भारत ढेरे (सचिव), आवेशअहमद हुसेनी (खजानीस), रंगराव एकल, उदय कुलकर्णी, मुकुंद रणदिवे, सुहास किरपेकर, रमेश पोवार, गोपाल ...

‘ईशरे’च्या कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी किसन लालवाणी
अन्य कार्यकारिणीमध्ये भारत ढेरे (सचिव), आवेशअहमद हुसेनी (खजानीस), रंगराव एकल, उदय कुलकर्णी, मुकुंद रणदिवे, सुहास किरपेकर, रमेश पोवार, गोपाल बिराजदार (सदस्य) यांचा समावेश आहे. या नूतन कार्यकारिणीचा शपथविधी ग्रहण कार्यक्रम रविवारी (दि. ११) ऑनलाईन स्वरूपात झाला. ईशरेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमिताबा सूर, उपाध्यक्ष एन. चंद्रशेखर, सचिव योगेश ठक्कर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी अध्यक्ष रिची मित्तल, पश्चिम विभागप्रमुख मिहिर संघवी, पुणे शाखेचे अध्यक्ष सतिश मेनन, रवींद्र यादव, भरत ढेरे, राजेंद्र इंगवले, सुरेश पाटील, भरत कदम उपस्थित होते. नीलेश देसाई यांनी बैठकीचे आयोजन केले.
सेट परीक्षेत संतोष जांभळे उत्तीर्ण
कोल्हापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्यामार्फत अधिव्याख्याता पदासाठी घेतलेल्या सेट परीक्षेमध्ये डॉ. संतोष गणपती जांभळे हे शिक्षणशास्त्र विषयात उत्तीर्ण झाले. यापूर्वी ते भूगोलशास्त्र विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना श्री. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांचे मार्गदर्शन, तर पत्नी डॉ. ज्योती जांभळे यांचे सहकार्य लाभले.
फोटो (१५०४२०२१-कोल-संतोष जांभळे (सेट)
शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जयंती साजरी
कोल्हापूर : कळंबा येथील वसंतराव नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. प्रा. धनंजय चाफोडीकर प्रमुख उपस्थित होते. प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. डॉ. मनिषा पाटील यांनी प्रास्ताविक केले. आण्णासाहेब पाटील यांनी आभार मानले.