कीर्तने, कादरीची विजयी सलामी
By Admin | Updated: May 12, 2015 00:42 IST2015-05-12T00:36:24+5:302015-05-12T00:42:06+5:30
‘केएसए’ आॅल इंडिया टेनिस : रंगलाणी, मेहता, प्रबोध, आहवळे यांचीही आगेकूच

कीर्तने, कादरीची विजयी सलामी
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय टेनिसपटू नितीन कीर्तने, हुसेन कादरी, रोहित रंगलाणी, राघवेंद्र सुब्रमण्यम, कैवल्य कल्मसे, हिमांशू मेहता, संकेत आहवळे, वंशल डिसोजा, शिमॉन शास्त्री, तेजस चौकुलकर, डीएच प्रशांत, प्रीत रामादोस, सौरभ शर्मा, आदित्य तिवारी, सूरज प्रबोध यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत एम.एस.एल.टी.ए. युनिक्स सनराईज के.एस.ए. आॅल इंडिया टेनिस रँकिंग मेन्स वन लॅक स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. शाहू मैदान येथील साठमारी टेनिस कोर्ट येथे सोमवारी मुख्य स्पर्धेस प्रारंभ झाला. सलामीची लढत आंतरराष्ट्रीय टेनिसपटू नितीन कीर्तने व रोहन सामंत यांच्यात झाली. ही लढत अपेक्षेप्रमाणे कीर्तनेने ६-१, ६-४ अशी सरळ सेटमध्ये जिंकत स्पर्धेची पुढील फेरी गाठली.पुरुष एकेरी स्पर्धेचा निकाल असा :
हुसेन कादरी (महाराष्ट्र) वि.वि. रोहन सामंत (महाराष्ट्र) ६-१, ६-४, रोहित रंगलाणी (महाराष्ट्र) वि.वि. संकेत तांबट (महाराष्ट्र) ६-१, ६-३, राघवेंद्र सुब्रमण्यम (कर्नाटक) वि.वि. धनेश गायकवाड (महाराष्ट्र) ६-०,
६-०, कैवल्य कल्मसे (महाराष्ट्र) वि.वि. नवदीश वंजाणी (महाराष्ट्र)
६-०, ६-०, हिमांशू मेहता (गुजराथ) वि.वि. एम. मोहिते (कर्नाटक) ६-३, ६-२, संकेत आहवळे (महाराष्ट्र) वि.वि. श्रीनिवास दर्शन (कर्नाटक)
६-०, ६-४, वंशल डिसोजा (महाराष्ट्र) वि.वि. मनिंदर सिंग (हरियाणा) ६-४, १-६, ६-२, शिमॉन शास्त्री (महाराष्ट्र) वि. वि. विशालसिंग (महाराष्ट्र) ६-४, ६-४, तेजस चौकुलकर (महाराष्ट्र) वि.वि. हर्षिथ संकर (आंध्र प्रदेश) ६-१, ७-५, डीएच प्रशांत (कर्नाटक) वि.वि. विनायक कुलकर्णी (महाराष्ट्र) ६-१, ६-०, प्रीत रामादोस (तमिळनाडू) वि. वि. कुशाजी निंबाळकर (महाराष्ट्र)
६-०, ६-२.
सौरभ शर्मा (महाराष्ट्र) वि.वि. मनाल देसाई (महाराष्ट्र) ६-४, ६-३, आदित्य तिवारी (मध्य प्रदेश) वि.वि. विक्रम धनंजय (तमिळनाडू) ६-३, ६-२, सूरज प्रबोध (कर्नाटक) वि.वि. शहिक ओसामा (आंध्र प्रदेश) ६-०, ६-०, सार्थक सिद्धार्थ (ओडिशा) वि.वि. सौरभसिंग (छत्तीसगड) ६-३, ६-२.
स्पर्धेचे उद्घाटन सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी दिलीपकुमार शिंदे, बँक आॅफ बडोदाचे सहायक महाप्रबंधक प्रकाश जुवळे यांच्या हस्ते झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय डेव्हिस चषक टेनिसपटू नितीन कीर्तने, के.एस.ए.चे अध्यक्ष दि. के. अतितकर, सचिव माणिक मंडलिक, नंदकुमार बामणे, स्पर्धा संचालक सरदार मोमीन, एआयटीए व एमएसएलटीए निरीक्षक मेहुल केनिया, विश्वंभर मालेकर-कांबळे, आदी उपस्थित होते.