कोल्हापूर : मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीत पोहचल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांचा दौरा चांगलाच गाजला. यानंतर आता पुन्हा एकदा सोमय्यांनी आपला मोर्चा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांच्याकडे वळवला आहे. सोमय्यांनी ट्विट करत मुश्रीफ यांचाविरोधात आता कारवाईचे संकेत दिले आहेत. सोमय्या आज, शुक्रवारी (दि. ०१) पुण्यात मुश्रीफ यांच्या विरोधात आयकर विभागाच्या अधिकार्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे यानंतर मुश्रीफांवर काय कारवाई होणार हे पाहावे लागणार आहे.सोमय्या यांनी हसन मुश्रीफ कुटुंब आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याविरोधात केंद्र सरकारने पुणे न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली आहे. त्यात फसवणूक, शेल कॉससाठी कलम ४४७ आणि ४३९ कंपनी कायदा आणि तपास IPC/CRPC कलम २५६ अन्वये कारवाईची विनंती केली आहे. पुढील काही दिवसांत यावर सुनावणी होणार आहे.
मंत्री हसन मुश्रीफांवर कारवाई होणार?, सोमय्या आयकर विभागाच्या अधिकार्यांची भेट घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 14:17 IST