शाळी पुलाजवळ घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:03+5:302021-06-01T04:19:03+5:30

मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील येळाणे-मलकापूर गावच्या हद्दीतील शाळी नदीवर असणाऱ्या इतिहासकालीन पुलाजवळ चिकण व्यापारी कोंबड्याची घाण टाकत असल्यामुळे ...

Kingdom of dirt near Shali bridge | शाळी पुलाजवळ घाणीचे साम्राज्य

शाळी पुलाजवळ घाणीचे साम्राज्य

मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील येळाणे-मलकापूर गावच्या हद्दीतील शाळी नदीवर असणाऱ्या इतिहासकालीन पुलाजवळ चिकण व्यापारी कोंबड्याची घाण टाकत असल्यामुळे येथे दुर्गधी सुटली आहे. या परिसरात रस्त्याच्या कडेला मेलेल्या कोंबड्या टाकल्यामुळे शाळी नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. कोंबड्याची घाण टाकणाऱ्या मलकापूर, येथील चिकण व्यापाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

शाळी नदीवर इंग्रजांनी दीडशे वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम केले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला झुडपे वाढली आहेत. याचा फायदा घेऊन चिकण व्यापारी मेलेल्या कोंबड्या, चिकणची घाण राजरोस महामार्गाच्या कडेला टाकत आहेत. या मार्गावरून नेहमी नागरिकांची ये-जा सुरू असते. येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गधी पसरल्यामुळे नाकाला रूमाल बांधून येथून जावे लागत आहे. येळाणे गावच्या हद्दीत घाण टाकली जात आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. त्यात या घाणीमुळे अधिक संसर्ग पसरण्याचा धोका आहे. चिकण व्यापाऱ्यांची चाैकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी येळाणे ग्रामस्थांतून होत आहे. मलकापुरातील चिकण व्यापाऱ्यांनी मेलेल्या कोंबड्या पुलाजवळ टाकल्या आहेत. त्यांच्यावर कोविड अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे पत्र तहसीलदार यांना देणार असल्याचे सरपंच मधुकर पाटील यांनी संगितले.

Web Title: Kingdom of dirt near Shali bridge