शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतूक ट्रकने धडक दिल्याने शिक्षक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 15:04 IST

कागलच्या शाहू हायस्कूलचे शिक्षक उद्धव सदाशिव पाटील (वय.५६, रा.पेठवडगाव) हे केएमटी बसला पाठीमागुन मालवाहतूक ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच ठार झाले असुन बस मधील इतर सातजण गंभीर जखमीं झाले आहेत. हा अपघात पहाटे ६.४५ च्या सुमारास पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेल शेजारी झाला.

ठळक मुद्देमालवाहतूक ट्रकने धडक दिल्याने शिक्षक जागीच ठारबस मधील इतर सातजण गंभीर जखमीं

शिरोली-कोल्हापूर : कागलच्या शाहू हायस्कूलचे शिक्षक उद्धव सदाशिव पाटील (वय.५६, रा.पेठवडगाव) हे केएमटी बसला पाठीमागुन मालवाहतूक ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच ठार झाले असुन बस मधील इतर सातजण गंभीर जखमीं झाले आहेत. हा अपघात पहाटे ६.४५ च्या सुमारास पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेल शेजारी झाला.या अपघातातील जखमींची नावे खालील प्रमाणे  

मधुकर यादव (वय ५०,रा. कणेरीवाडी), गौरू सुतार (५४,रा.सदर बाजार), रुपा सुतार (५५, रा. मुलुंड, मुंबई), रमेश गुरव (६५, रा. मुलुंड, मुंबई), शिवराम चौधरी (२६,रा.कागल), बस चालक हंबीरराव यादव (५७, रा.वरणगे पाडळी), सतिश कुंभार (५५, रा. बापट कॅम्प) हे जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी कागल शाहू हायस्कूलचे शिक्षक उद्धव पाटील हे शाळेत वार्षिक क्रिडा स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ आणि स्नेह सम्मेलन  असल्याने घरातुन सकाळी सहाच्या अगोदरच बाहेर पडले होते.

तावडे हॉटेल येथे कोल्हापूर कागल बस सकाळी ६.४५ वाजता आली असता पाटील बस मध्ये बसले सेवा मार्गावरून बस  महामार्गावर गेली असता याच वेळी पुण्याहून बंगळूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मालवाहतूक ट्रकने बसला मागून उजव्या बाजूला जोरात धडक दिली.

धडक इतकी जोरात होती की बसचा मागील बाजूचा भाग चक्काचूर झाला आहे. या जोराच्या धडकेत  पाटील बस मधुन बाहेर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला इजा  झाली. यात ते जागीच ठार झाले.तर बस मध्ये मागे बसलेले प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत.  सात जणांना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे.अपघाताची माहिती कळताच जखमींच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारानी सीपीआर मध्ये गर्दी केली होती. या घटनेची नोंद गांधीनगर   पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघातstate transportएसटीkolhapurकोल्हापूर