शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

..म्हणून रागातून मित्राला संपवले; कोल्हापुरातील फिरस्त्या मजुराच्या खुनाचे कारण स्पष्ट

By उद्धव गोडसे | Updated: December 19, 2023 16:58 IST

आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी

कोल्हापूर : दारू पिण्यासाठी पाणी आणले नसल्याच्या रागातून फिरस्ता मजूर विनायक विश्वास लोंढे (वय ३४, रा. सदर बाजार, कोल्हापूर) याचा मित्रानेच खून केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. हल्लेखोर लखन तमाम उर्फ समीर युनूस मणेर (वय ३४, रा. कदमवाडी, कोल्हापूर) याने डोक्यात सोड्याच्या बाटल्या फोडून आणि छातीत लाथा मारून लोंढे याचा खून केला. ही घटना काल, सोमवारी (दि. १८) रात्री साडेआठच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पादचारी उड्डाण पुलाखाली गिरीश बारजवळ घडली.मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडलेल्या खुनाच्या घटनेबाबत प्रतिभा विजय भोसले (वय ३८, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक लोंढे हा सोमवारी रात्री त्याच्या काही मित्रांसोबत मध्यवर्ती बसस्थानक परिसरात उघड्यावर मद्यप्राशन करीत बसला होता. त्यावेळी समीर मणेर याने दारू पिण्यासाठी लोंढे याला जवळच्या सोडा-पाण्याच्या गाडीवरून पाणी आणण्यास सांगितले. लोंढे याने पाणी आणण्यास नकार दिला. याचा राग आल्याने मणेर याने सोड्याच्या बाटल्यांनी लोंढे याला मारहाण केली. तसेच त्याला जमिनीवर पाडून छातीत लाथा मारल्या. यामुळे लोंढे याचा जागीच मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. घटनास्थळी मणेर याचे दोन मित्र होते. मात्र, त्यांचा मारहाणीत सहभाग नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली. हल्लेखोर मणेर याला न्यायालयात हजर केले असता, त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस