कीकबॉक्सिंग स्पर्धेत जिल्ह्याला १५ सुवर्ण, २ रौप्य, ३ कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2015 23:56 IST2015-07-28T23:56:02+5:302015-07-28T23:56:02+5:30

कोल्हापूर विभाग : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

In the kickboxing competition, the district has 15 gold, 2 silver, 3 bronze | कीकबॉक्सिंग स्पर्धेत जिल्ह्याला १५ सुवर्ण, २ रौप्य, ३ कांस्य

कीकबॉक्सिंग स्पर्धेत जिल्ह्याला १५ सुवर्ण, २ रौप्य, ३ कांस्य

चिपळूण : कोल्हापूर विभागीय कॅडेट व सिनियर कीकबॉक्सिंग चॅम्पियनशीप २०१५ या विभागीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करुन १५ सुवर्ण, २ रौप्य व ३ कांस्यपदकांची कमाई केली असून, कोल्हाूपर विभागाच्या संघात स्थान पक्के केले आहे. सातारा जिल्हा अ‍ॅमॅच्युअर कीकबॉक्सिंग असोसिएशनतर्फे शिवाजी उदय मंडळ, सातारा येथील सभागृहात ही स्पर्धा झाली. सातारा जिल्हा कीकबॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष वीरभद्र कावडे व अर्जुन जांभळे यांच्या प्रयत्नाने स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेत १० ते १२ वर्षांखालील वयोगटातील पॉर्इंट फाईट प्रकारात मुलांमध्ये २८ किलो खालील वजनी गटात सुदेश म्हामणकर कांस्य, पारस पालांडे ३२ किलो वजनी गटात कांस्य, धीरज गोमले ३७ किलो वजनी गटात रौप्य, अथर्व सुर्वे ४२ किलो वजनी गटात सुवर्ण, आदित्य कदम ४७ किलो वजनी गटात रौप्य, मुलींमध्ये महिका प्रकाश ४२ किलो वजनी गटात सुवर्ण तसेच १५ वर्षांखालील वयोगटातील लाई व काँटॅक्ट प्रकारात मुलांमध्ये संकेत भोसले ३७ किलो वजनी गटात सुवर्ण, कीक लाईट प्रकारात जयवंत जगदाळे ३७ किलो वजनी गटात सुवर्ण, सूर्यकांत आखाडे ३७ किलो वजनी गटात रौप्य, अविनाश माने ४६ किलो वजनी गटात सुवर्ण, पॉर्इंट फाईट प्रकारात ओंकार कदम ४२ किलो वजनी गटात सुवर्ण, नील वेल्हाळ ४६ किलो वजनी गटात सुवर्ण, रिजवान खान सुवर्ण व १९ वर्षांखालील वयोगटात पॉर्इंट फाईट प्रकारात विनोद राऊत ४५ किलो वजनी गटात सुवर्ण, योगिता खाडे ६० किलो वजनी गटात सुवर्ण, कीक लाईट प्रकारात हुजैफा ठाकूर सुवर्ण, योगिता खाडे सुवर्ण, लाईट कॉटॅक्ट प्रकारात मंदार साळवी ५७ किलो वजनी गटात सुवर्ण, के-१ प्रकारात हुजैफा ठाकूर कांस्य, लो कीक प्रकारात विनोद राऊत सुवर्ण, फुल कॉटॅक्ट प्रकारात मंदार साळवी सुवर्ण यांनी यश मिळविले.
सुवर्णपदकप्राप्त खेळाडूंची कोल्हापूर विभाग संघातून २५ ते ३० आॅगस्टला पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॅडेट व सिनिअर कीकबॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत ते सहभागी होतील. संस्थाध्यक्ष अजित खाडे, प्रमुख मार्गदर्शक योगिता खाडे, सुयोग सावंत, मंगेश माटे, मुनिश जैतपाल व उदय देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले. (प्रतिनिधी)

Web Title: In the kickboxing competition, the district has 15 gold, 2 silver, 3 bronze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.