शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापतिपदी खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST2021-02-10T04:23:58+5:302021-02-10T04:23:58+5:30
सभापती सौ. सुनीता सुरेश पारळे तर उपसभापती विजय खोत यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे ही दोन्ही पदे ...

शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापतिपदी खोत
सभापती सौ. सुनीता सुरेश पारळे तर उपसभापती विजय खोत यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे ही दोन्ही पदे एक महिना रिक्त राहिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे सभापतिपदासाठी विजय खोत यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना अनुमोदक म्हणून पंचायत सदस्य सौ. सुनीता पारळे यांनी सही केली होती तर उपसभापतिपदासाठी दिलीप पाटील यांनी अर्ज भरला होता. त्यांना अनुमोदन म्हणून सदस्या डॉ स्नेहा जाधव यांनी सही केली होती. दोन्ही पदांसाठी एक एक अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे दोन्ही पदाची निवडणूक बिनविरोध झाली, असे तहसीलदार गुरू बिराजदार यांनी जाहीर केले. नूतन सभापती विजय खोत, उपसभापती दिलीप पाटील याचा सत्कार बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली. विजय खोत व दिलीप पाटील यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. शाहूवाडी पंचायत समितीवर सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील, राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड यांची सत्ता आहे. निवडीस बांधकाम सभापती हंबीरराव पाटील माजी सभापती अश्विनी पाटील, डॉ. स्नेहा जाधव , सदस्य पांडुरंग पाटील, अमर खोत, लतादेवी पाटील तालुकाप्रमुख दत्ता पोवार, उप जिल्हाप्रमुख नामदेव गिरी, सरपंच तुकाराम पाटील, अमर पाटील उपस्थित होते.
फोटो १) विजय खोत - सभापती
2) दिलीप पाटील .