शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लॉबिंगचा प्रयत्न : कोल्हापुरातील चित्रीकरणास मुंबईतून ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 19:11 IST

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सध्या मुंबई-पुणे रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे सिनेसृष्टीची परंपरा, तंत्रज्ञ, व्यावसायिक, रेडी टू पब्लिश असलेल्या कोल्हापुरात चित्रीकरण सुरू करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून प्रयत्न सुरू आहेत. त्याला पालकमंत्री सतेज पाटील यांनी साथ देत शनिवारी (दि.२३) चित्रीकरणासाठीची अधिकृत परवानगी दिली.

ठळक मुद्देव्यवसाय बुडण्याच्या भीतीपोटी मुंबईतच चित्रीकरणासाठी दबाव

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे रखडलेल्या मालिका व चित्रपटांचे कोल्हापुरात चित्रीकरण करण्यास मुंबईतील काही व्यावसायिकांकडून ‘खो’ घातला जात आहे. चित्रीकरण कोल्हापूरला गेले तर आपला व्यवसाय बुडेल, या मानसिकतेतून लॉबिंग केले जात असून, कोरोनासंबंधीच्या नियमांबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांवर मुंबईत चित्रीकरण सुरू करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे पुढे आले आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सध्या मुंबई-पुणे रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे सिनेसृष्टीची परंपरा, तंत्रज्ञ, व्यावसायिक, रेडी टू पब्लिश असलेल्या कोल्हापुरात चित्रीकरण सुरू करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून प्रयत्न सुरू आहेत. त्याला पालकमंत्री सतेज पाटील यांनी साथ देत शनिवारी (दि.२३) चित्रीकरणासाठीची अधिकृत परवानगी दिली. मात्र, अद्याप एक जाहिरातवगळता चित्रीकरणासाठीची पावले पुढे सरकलेली नाहीत किंवा चॅनेल हेड, निर्मात्यांनी आपली मालिका येथे आणण्यासाठी हिरवा कंदील दाखविलेला नाही. यामागे मुंबईतील लॉबिंग हे मुख्य कारण असल्याचे येथील व्यावसायिकांच्या लक्षात आले आहे.

कोल्हापुरात चित्रीकरण सुरू झाले तर मुंबईतील व्यावसायिकांना फटका बसेल, या मानसिकतेतून तेथील निर्मात्या संस्थांवर दबाव टाकला जात आहे. वर्षानुवर्षांचे हितसंबंध तोडले तर आपल्याला पुढे अडचणी येतील, ही भीती तेथील कलाकार व निर्मात्यांना असल्याने त्यांच्याकडून सावध पावले टाकली जात आहेत.

क्वारंटाईनबद्दल गैरसमजनवे प्रकल्प कोल्हापुरात सुरू होऊ नयेत यासाठी कोरोनासंबंधीच्या नियमावलींचा बाऊ केला जात आहे. कोल्हापुरात गेलात की तुम्हाला तेथे क्वारंटाईन व्हावे लागेल. मुंबईत परत येता येणार नाही. नियमावलींसंदर्भात शासनाचा अध्यादेश आलेला नाही, तिथे अडकून बसाल, मुंबईत काम करताना अडचणी येतील, असे गैरसमज पसरविले जात आहेत. मुंबईचे लोक इतके घाबरले आहेत की, अडचणीत सापडण्यापेक्षा आणखी एक महिना घरात बसण्याचीही त्यांची तयारी आहे. या राजकारणातून अनेकांनी कोल्हापुरात येण्याची इच्छा असतानाही अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcinemaसिनेमा