शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

शिरोलीत खवरे-करपे यांच्यात काटाजोड सामना, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 15:18 IST

निवडणुकीत पारंपरिक श्री शाहू स्वाभिमानी आघाडी आणि महाडिक गट अशी स्थानिक गट जरी असले तरी एक प्रकारे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशील थेट दुरंगी लढत

सतीश पाटील शिरोली : शिरोली ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत पारंपरिक श्री शाहू स्वाभिमानी आघाडी आणि महाडिक गट अशी स्थानिक गट जरी असले तरी एक प्रकारे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशील थेट दुरंगी लढत होत आहे. सरपंच पदासाठी उमेदवार रुपाली अनिल खवरे या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आहेत तर पद्मजा कृष्णात करपे या भाजपच्या समर्थक आहेत. सरपंच पद हे सर्व साधारण महिला गटासाठी आरक्षित आहे. दोन्ही गट तुल्यबळ असल्याने निवडणूक चुरशीची होणार.शिरोली ग्रामपंचायतीसाठी एकूण सहा प्रभाग असून १९३६३ मतदार मतदानाचा कौल देणार आहेत एकूण सदस्य संख्या १७ आहे. यात पुरुष मतदार १०,१२४ तर स्त्री मतदार ९२३९ आहेत. सध्या ग्रामपंचायतीवर श्री शाहू स्वाभिमानी आघाडीची सत्ता आहे. ही सत्ता अबाधित राखण्यासाठी आघाडीने सरपंच पदासह १७ उमेदवार हे तुल्यबळ दिले आहेत.

तर विद्यमान सरपंच शशिकांत खवरे यांच्या पत्नी माजी पंचायत समिती  उपसभापती सुचित्रा खवरे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली असून रुपाली खवरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारणार असल्याचे शशिकांत खवरे यांनी जाहीर केले. रुपाली खवरे या शिवसेना नेते पंचायत समिती माजी सदस्य अनिल खवरे यांच्या पत्नी आहेत. तर महाडिक गटाकडून माजी उपसरपंच कृष्णात करपे यांच्या पत्नी पद्मजा करपे‌ यांना सरपंच पदासाठी अमल महाडिक यांनी उमेदवारी  जाहीर केली असून इतर चार उमेदवारांना माघार घ्यायला लावली. यात भाजपचे तालुकाध्यक्ष आणि गावकामगार पोलीस पाटील राजेश पाटील यांच्या पत्नी राजेश्वरी पाटील यांना महादेवराव महाडिक शेवट पर्यंत उमेदवारी जाहीर करतील अशी आशा होती; पण यावेळी सुद्धा पाटील घराण्याला दुसऱ्यांदा डावलले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत शिरोली ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील एक सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीवर सत्ता कायम ठेवण्यासाठी श्री शाहू स्वाभिमानी आघाडीचे नेते शशिकांत खवरे, महेश चव्हाण, अनिल खवरे, बाजीराव जाधव यांनी मोठी यंत्रणा लावली आहे. तर सत्तांतर घडवण्यासाठी अमल महाडिक यांनी स्वतः यंत्रणा हाती घेतली आहे. 

महाडिक गटाकडून सरपंच पदासाठी इच्छुक असणाऱ्या राजेश्वरी पाटील, पुष्पा पाटील, डॉ सोनाली पाटील आणि कमल कौंदाडे यांना माघार घ्यायला लावली आहे. मुस्लिम समाजाचे जास्त मतदान या निवडणुकीत एकूण मतदाना पैकी ५ हजार पेक्षा जास्त मतदान हे एकट्या मुस्लिम समाजाचे आहे आणि तसेच पाटील समाजाचे मतदान सुद्धा ३ हजार पेक्षा जास्त आहे हे दोन्ही मतदान निर्णायक आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक