पावसाने दांडी मारल्याने खरीप हंगाम धोक्याच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:16 IST2021-07-12T04:16:27+5:302021-07-12T04:16:27+5:30

पावसाने दांडी मारली, त्याचा परिणाम खरीप हंगामावर झाला. पाऊस नसल्याने पिके माना टाकू लागली. मृग नक्षत्रातील रासायनिक खतांचा ऊस ...

The kharif season is on the verge of danger due to heavy rains | पावसाने दांडी मारल्याने खरीप हंगाम धोक्याच्या उंबरठ्यावर

पावसाने दांडी मारल्याने खरीप हंगाम धोक्याच्या उंबरठ्यावर

पावसाने दांडी मारली, त्याचा परिणाम खरीप हंगामावर झाला. पाऊस नसल्याने पिके माना टाकू लागली. मृग नक्षत्रातील रासायनिक खतांचा ऊस पिकांना डोस दिलेल्या ऊस क्षेत्राला पावसाची गरज आहे. करवीर तालुका पश्चिम माळरान, डोंगर परिसर, खडकाळ जमिनीमधील शेतीतील ऊस पिके आता करपू लागली आहेत.

पाऊस नसल्यामुळे डोंगरी भागातील भात रोपे वाळू लागली आहेत. भोगावती, तुळशी नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. पिकांना पाऊस नसल्यामुळे शेतीतील मशागतीची कामे थांबली आहेत.

एकीकडे कोरोनाची धास्ती, तर दुसरीकडे खरीप पिके वाळू लागल्याची भीती, अशा दुहेरी संकटाला बळीराजाला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: The kharif season is on the verge of danger due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.