कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. बहुतांशी तालुक्यात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळल्याने खरीप काढणी काहीसी थंडावली आहे. शिवारात पाणी झाल्याने विशेषता भाताची कापणी आणि मळणी करता येत नाही. आगामी दोन दिवस पावसाचे राहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ऐन सणासुदीत पाऊस पडल्याने दिवाळीचा काही प्रमाणात बेरंग झाला.गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाळी वातावरण आहे. गुरुवारी रात्री अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहिले. दुपारनंतर पावसाने सुरुवात केली. कोल्हापूर शहरात पावणे दोनच्या सुमारास पाऊस सुरू झाला. काही वेळ जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर, भुरभुर राहिली. या पावसाने खरीप काढणीला फटका बसला आहे.जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये खरिपाची काढणीची धांदल सुरू आहे. भात, नागली, भुईमुगाच्या काढणीला या पावसाने फटका बसला आहे. काही तालुक्यांत खरीप ज्वारीही काढणीस आली असून, कणसांमध्ये पाणी पडल्याने दाणे काळे पडण्याचा धोका अधिक असतो. शिवारात पाणी असल्याने भाताची कापणी करता येईना. कापणी केली, तर मळणी कोठे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
गुऱ्हाळघरांचेही नुकसानजिल्ह्यात गुऱ्हाळघरांनी गती घेतली आहे. पावसामुळे जळण भिजत असून, ऊस तोडणीही करता येत नाही. खराब हवामानाचा गुळाच्या प्रतीवरही परिणाम होत आहे.
Web Summary : Heavy rain in Kolhapur disrupted Kharif harvesting, especially rice. Farmers face challenges in cutting and threshing due to waterlogged fields. The weather also affects jaggery production, wetting fuel and impacting the quality of jaggery. More rain is expected.
Web Summary : कोल्हापुर में भारी बारिश से खरीफ की कटाई बाधित हुई, विशेषकर धान की। जलभराव वाले खेतों के कारण किसानों को कटाई और मड़ाई में चुनौतियों का सामना करना पड़ रहा है। मौसम गुड़ उत्पादन को भी प्रभावित करता है, ईंधन गीला होता है और गुड़ की गुणवत्ता प्रभावित होती है। और बारिश की उम्मीद है।