शिरोळ पूरग्रस्त समितीच्या वतीने ‘खर्डा भाकरी’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:28 IST2021-08-20T04:28:54+5:302021-08-20T04:28:54+5:30
शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्या वतीने तिसऱ्या दिवशीही तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. वेगवेगळ्या संघटनेच्या नेत्यांनी ...

शिरोळ पूरग्रस्त समितीच्या वतीने ‘खर्डा भाकरी’ आंदोलन
शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्या वतीने तिसऱ्या दिवशीही तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. वेगवेगळ्या संघटनेच्या नेत्यांनी यावेळी पाठिंबा व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष पुंडलिक जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक, प्रहार जनशक्ती पक्षाचे जयराज कोळी यांच्यासह मान्यवर आंदोलनात सहभागी झाले होते.
शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून विविध आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाच्या ठिकाणी चूल पेटवा, खर्डा भाकरी, असे अनोखे आंदोलन करण्यात आले.
यावेळी समितीचे अध्यक्ष रामचंद्र डांगे, डॉ. संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकार मादनाईक, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, ॲड. सुशांत पाटील, बाबासाहेब नदाफ, रफिक पटेल, बाळासाहेब माळी, सुनील इनामदार, रामदास भंडारे, भास्कर कुंभार, सुरेश सासणे, अप्पासाहेब बंडगर, सुरेश सासने, दगडू माने, दिगंबर सकट, मनीषा डांगे, सोनाली मगदूम, दयानंद मालवेकर उपस्थित होते.
फोटो - १९०८२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरोळ येथे तहसील कार्यालयासमोर पूरग्रस्त समितीच्या वतीने खर्डा भाकरी आंदोलन करण्यात आले.