खंडोबा तालीम, गोल्ड स्टार विजयी

By Admin | Updated: January 28, 2015 23:57 IST2015-01-28T23:57:47+5:302015-01-28T23:57:47+5:30

दुसरा सामना गोल्डस्टार स्पोर्टस विरुद्ध झुंजार क्लब यांच्यामध्ये झाला

Khandoba Talim, Gold Star Won | खंडोबा तालीम, गोल्ड स्टार विजयी

खंडोबा तालीम, गोल्ड स्टार विजयी

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् ्असोसिएशन आयोजित के. एस. ए. ‘बी’ डिव्हिजन फुटबॉल लीग स्पर्धेत आज, बुधवारी झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ ‘ब’ व गोल्डस्टार स्पोर्टस क्लब यांनी विजय मिळविला.
पहिला सामना खंडोबा तालीम मंडळ ‘ब’ विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ यांच्यामध्ये झाला. या सामन्यात खंडोबाच्या संकेत चव्हाण याने एकमेव गोल केला. दुसरा सामना गोल्डस्टार स्पोर्टस विरुद्ध झुंजार क्लब यांच्यामध्ये झाला. या सामन्यात गोल्डस्टार स्पोर्टस् क्लबने झुंजार क्लबचा २-० अशा गोलफरकाने मात केली. यामध्ये गोल्डस्टारकडून राजेश पाटील व अखिल पाटील यांनी गोल केले. (प्रतिनिधी)

Web Title: Khandoba Talim, Gold Star Won