विफा फुटबॉल स्पर्धेत ‘खंडोबा’ची आगेकूच

By Admin | Updated: April 27, 2017 00:05 IST2017-04-27T00:05:27+5:302017-04-27T00:05:27+5:30

तीनपैकी दोन सामने जिंकत खंडोबा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

'Khandoba' ahead of VIFA football tournament | विफा फुटबॉल स्पर्धेत ‘खंडोबा’ची आगेकूच

विफा फुटबॉल स्पर्धेत ‘खंडोबा’ची आगेकूच

कोल्हापूर : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे भरविण्यात आलेल्या १४ वर्षांखालील विफा फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने तीनपैकी दोन सामने जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला. मुंबई येथील कुपरेज मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात कोल्हापूरच्या खंडोबा तालीम मंडळाच्या १४ वर्षांखालील संघाने पहिल्या सामन्यात आॅल इंडिया यूथ फुटबॉल अकॅडमीवर २-० अशी मात केली. त्यात प्रतीक माने व देवराज सावंत यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात नागपूरच्या रोबिनी एफसी या संघावर २-१ अशी मात केली. ‘खंडोबा’कडून प्रतीक मानेच्या पासवर विश्व शिंदेने गोल करत १-० अशी आघाडी आपल्या संघास मिळवून दिली तर सिद्धीक नायकवडीच्या पासवर आदित्य लायकरने गोल करत २-० अशी आघाडी मिळवून दिली. आॅल इंडिया यूथ फुटबॉल संघाकडून तन्वीर मोमीनने गोल नोंदवत ही आघाडी २-१ ने कमी केली. अखेरपर्यंत हीच गोलसंख्या कामय राहिल्याने सामना ‘खंडोबा’ने जिंकला. तिसऱ्या सामन्यात गोवन्स (मुंबई) संघाकडून २-१ असा पराभव स्वीकारला. तीनपैकी दोन सामने जिंकत खंडोबा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

Web Title: 'Khandoba' ahead of VIFA football tournament