खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर अपघातात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:06 IST2019-04-13T00:06:30+5:302019-04-13T00:06:36+5:30
बेळगाव : चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने इनोव्हाला अपघात होऊन खानापूरच्या काँग्रेस आमदार अंजली निंबाळकर यांच्यासह तिघेजण जखमी झाले आहेत. ...

खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर अपघातात जखमी
बेळगाव : चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने इनोव्हाला अपघात होऊन खानापूरच्या काँग्रेस आमदार अंजली निंबाळकर यांच्यासह तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात सोलापूरजवळ शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान झाला. जखमींना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंजली या कर्नाटकचे विशेष पोलीस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी आहेत.
अंजली या खानापूरहून सोलापूर मार्गे नांदेडकडे आपल्या इनोव्हा गाडीने महाराष्टÑाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण प्रचारासाठी निघाल्या होत्या. सोलापूजवळील हत्तूर येथे एका कारने निंबाळकर यांच्या इनोव्हा गाडीला कट मारला. यामुळे इनोव्हा पलटी झाल्याने अंजली यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातात कार चालक महादेव आणि अंग रक्षक सय्यद हेही जखमी झाले आहेत. अंजली या अशोक चव्हाण यांच्या नातेवाईक आहेत.