शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

खामकरवाडी पाझर तलाव 'ओव्हर फ्लो'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:16 AM

श्रीकांत ऱ्हायकर धामोड : खामकरवाडी - अवचितवाडीदरम्यान असलेला खामकरवाडी लघु ...

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड : खामकरवाडी - अवचितवाडीदरम्यान असलेला खामकरवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प रविवारी मध्यरात्री दहा वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे धरणाच्या उजव्या बाजूच्या सांडव्यातून मोठ्‌या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. हे पाणी तुळशी नदीपात्रात मिसळल्याने नदी पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तसेच धरणाच्या सांडव्यावरून पडणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी धरण स्थळावर होत आहे.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोठ्‌या धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे, तर तालुक्यातील छोट्‌या -मोठ्या प्रकल्पांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. काही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

जूनच्या पहिल्याच आठवड्‌यापासून पावसाने दमदार एंट्री केल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून रोप लागणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

खामकरवाडी ( ता. राधानगरी ) येथील अवचितवाडी व खामकरवाडी या दोन गावांसाठी वरदान ठरणारा प्रकल्प जुनच्या पंधरवड्यात प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला आहे. याअगोदर हा प्रकल्प जुलैअखेर अथवा ऑगस्टमध्ये भरत होता. पण हा प्रकल्प प्रथमतःच इतक्या लवकर भरल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. गतसाली हा प्रकल्प लवकरच कोरडा पडल्याने शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र बनला होता. पण गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू झाल्याने कोरडा पडलेला प्रकल्प रविवारी मध्यरात्री अकराच्या दरम्यान पूर्ण क्षमतेने भरला. या प्रकल्पात ११६२.७८ सहस्र घनमीटर इतका पाणीसाठा होत असून या दोन गावातील लोकांचा पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाच्या पाण्यासाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी वर्गातून मोठे समाधान व्यक्त होत आहे.

फोटो ओळी -

खामकरवाडी (ता. राधानगरी ) येथील पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, सांडव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यासह तलावाचे विहंगम दृश्य.