सवतेतील बोअरवरून जलव्यवस्थापनमध्ये खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST2020-12-31T04:25:16+5:302020-12-31T04:25:16+5:30

कोल्हापूर : पन्हाळा विधानसभा मतदार संघातील राजकारणातून शाहूवाडी तालुक्यातील सवतेमधील बोअरवरून बुधवारी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समिती सभेमध्ये ...

Khadajangi in water management from Savat bore | सवतेतील बोअरवरून जलव्यवस्थापनमध्ये खडाजंगी

सवतेतील बोअरवरून जलव्यवस्थापनमध्ये खडाजंगी

कोल्हापूर : पन्हाळा विधानसभा मतदार संघातील राजकारणातून शाहूवाडी तालुक्यातील सवतेमधील बोअरवरून बुधवारी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समिती सभेमध्ये खडाजंगी उडाली. शिवसेनेचे बांधकाम सभापती हंबीरराव पाटील आणि जनसुराज्यचे सदस्य शिवाजी मोरे यांच्यात हा वाद झाला. या सभेच्या अध्यक्षस्थानी बजरंग पाटील होते.

सवते येथील खासगी बोअर संबंधितांनी ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली आहे. त्यावर ग्रामपंचायतीने खर्चही केला आहे, वीजबिलेही भरली आहेत. मात्र, असे असताना आता ही बोअर पुन्हा आपल्याला मिळावी, अशी संबंधिताने मागणी केली आहे. याबाबतचा ठराव बुधवारच्या सभेत होणार होता, त्याला शिवाजी मोरे यांनी विरोध केला. एकदा हस्तांतरित केलेली बोअर परत देता येते का, याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी मोरे यांनी केली. मात्र, हंबीरराव पाटील हे मोरे यांना बोलण्यापासून रोखत होते. पाटील यांनी प्रशासनाला उत्तर देण्यापासून रोखल्याचाही आरोप मोरे यांनी यावेळी केला. त्यावर, ‘तुम्ही जास्त भाषण द्यायचं नाही’, असे पाटील यांनी सांगितले. तेव्हा मोरे यांनी ‘तुम्ही बोलूच देणार नसाल तर मग मी बाहेरच जातो,’ असे सुनावले. पाटील हे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांचे समर्थक असून, माेरे हे जनसुराज्यचे आमदार विनय कोरे यांचे समर्थक आहेत. या सभेला उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील, हेमंत कोलेकर, राणी खमलेट्टी, स्वरूपाराणी जाधव उपस्थित होत्या.

Web Title: Khadajangi in water management from Savat bore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.