शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

कोल्हापुरातील केशवराव नाट्यगृहाला आकार, रुफकाम सुरू; तांत्रिक अडचणी दूर झाल्याने कामाला गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 18:00 IST

तज्ज्ञ अभियंत्यांची देखरेख 

कोल्हापूर : तमाम नाट्य कलाकार आणि रसिकांची अस्मिता असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बांधकामाने समाधानकारक गती घेतली असून, सध्या रुफ कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पुढील पंधरा दिवसांत हेदेखील काम पूर्ण होऊन नवीन टप्प्यातील कामाला सुरुवात केली जाणार आहे.केशवराव भोसले नाट्यगृहाला दि.८ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री दहा वाजता आग लागून या आगीत नाट्यगृहाच्या छताचा सगळा भाग जळून खाक झाले. राज्य सरकारच्या मदतीतून हे नाट्यगृह पुन्हा एकदा जसेच्या तसे उभे राहत असल्याचे पाहून नाट्य कलाकारांसह कोल्हापूरकरांना त्यांच्या अपेक्षांबाबत एक आशावाद निर्माण झाला आहे.मुंबईच्या स्ट्रक्टवेल कंपनीकडून नाट्यगृहाची पुनर्रबांधणी केली जात असून ऐतिहासिक वास्तूंच्या दुरुस्तीचा अनुभव असलेल्या तज्ज्ञ अभियंत्यांच्या देखरेखीखाली इमारतीचे काम सुरू आहे. सुरुवातीला जळालेले छत उतरवून घेण्यात आले. जेथे भिंतींना तडे गेले होते, त्या भिंती उतरवून घेण्यात आल्या. त्यानंतर खऱ्या अर्थाने पुनर्रउभारणी सुरू झाली.भिंतींचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. इमारतीच्या मागील भिंतीवर असलेला मीनी टॉवर बसविण्यासाठी भिंतीचे काम पूर्ण केले जात आहे. दक्षिण व उत्तर बाजूकडील भिंतींचे मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. भिंतीना गिलावा झाला आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा थरही देण्यात आला आहे. आता अभियंत्यांनी रुफ काम करण्यावर सर्व लक्ष केंद्रीत केले आहे. सुरुवातीला स्ट्रक्चर उभारले जाईल, नंतर छतावर पत्रे बसविले जाणार आहेत. फॅब्रीकेशनची सर्व कामे पूर्ण झाली असून मटेरियल जागेवर आणून ठेवले जात आहे. आता फक्त ते जोडायचे राहिले आहे.

नाट्यगृहाच्या रुफ कामाला सुरुवात झाली आहे. बांधकामातील सर्व तांत्रिक त्रुटी दूर झाल्याने काम जलदगतीने सुरू आहे. रुफ कामदेखील पुढील पंधरा दिवसांत पूर्ण करण्यात येईल. - श्रीनिवास सुलगे, व्यवस्थापकीय संचालक, स्ट्रक्टवेल कंपनी

टॅग्स :kolhapurकोल्हापूर