शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Kolhapur- Keshavrao Bhosle Theatre Fire: आगीचे गूढ उकलण्याचे आव्हान, ‘सीसीटीव्ही’तूनच सत्य येणार समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 16:49 IST

साहित्य न हलविण्याच्या ‘फॉरेन्सिक’च्या सूचना

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिस, फॉरेन्सिक विभाग तसेच महापालिका चौकशी समितीसमोर आहे. या आगीबाबत दोन-तीन दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली नसल्याची बाब समोर आल्यामुळे या चर्चेला ऊत आला आहे.दरम्यान, महापालिका प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीमार्फत नाट्यगृहाच्या आगीची चौकशी सुरू झाली असून समिती वेगवेगळ्या विभागाकडून, व्यक्तीकडून माहिती घेत आहे. या कामाला सुरुवात होत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे दौरे झाले. त्यामुळे समितीतील अधिकाऱ्यांचा वेळ मंत्र्यांच्या दौऱ्यातच गेला. आज, सोमवारपासून या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.इलेक्ट्रिकल तज्ज्ञांनी केलेल्या अनौपचारिक पाहणीतून तसेच महावितरणतर्फे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली नसल्याचा खुलासा करण्यात आल्यामुळे नेमकी आग कशामुळे लागली, असा सवाल उपस्थित झाला आहे. नाट्यगृहाच्या मागील बाजूस असलेल्या कुस्तीच्या मॅटमुळे आग भडकली असावी, असा संशय घेतला जात आहे. शिवाय आग लागल्यानंतर काही मिनिटांनी तेथे दोन मोठे आवाज झाल्याची चर्चाही आता ऐकायला मिळत आहे. त्यामुळे हा संशय अधिक बळावला आहे. या चौकशीकामी महत्त्वाचा दुवा म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरात लावलेले सीसीटीव्ही असून त्याचा डीव्हीआर ताब्यात घेतला आहे. त्यातूनही काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.कुस्त्यांच्या मॅटनी केला घातआगीचा भडका उडण्यास कुस्त्यांच्या मॅटनी मोठा हातभार लावल्याचे प्राथमिक पाहणीवरून स्पष्ट झाले आहे. खासबाग मैदानातील व्यासपीठावर बरीच मॅट होती. काही मॅट नाट्यगृहाच्या भिंतीला लावून ठेवण्यात आली होती. या मॅटनी पेट घेतल्यामुळे आग नाट्यगृहाकडे वळली. कुस्ती सराव करण्यास संबंधित पैलवानांनी परवानगी घेतली होती का? या मॅट कोणी आणून ठेवल्या होत्या, त्याची पुरेशी दक्षता घेतली का नाही, या गोष्टी चौकशीतून पुढे येणार आहेत.

मग ट्रीप कसे झाले नाही

शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून महावितरण विभागाने मार्गदर्शक नियम घालून दिले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिकची कामे करणारे तंत्रज्ञ त्याचे काटेकाेरपणे पालन करतात. जर वीजप्रवाह वाढला किंवा कमी झाला की शॉर्ट सर्किट न होता ट्रीप होऊन विद्युत पुरवठा बंद होतो. परंतु केशवराव भोसले नाट्यगृहात ट्रीपही झालेले नाही. इलेक्ट्रिक कंट्रोल पॅनेल, इन्व्हर्टर रूम तसेच तेथून बाहेर पडणाऱ्या वायर्स सर्व काही सुस्थितीत आहे. त्यामुळेच आग लागली की लावली, असा संशय व्यक्त होत आहे.साहित्य न हलविण्याच्या ‘फॉरेन्सिक’च्या सूचनानाट्यगृहातील साहित्याला कोणीही हात लावू नये, तेथील साहित्य हलवू नये, अशा सूचना फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला दिल्या आहेत. त्यांना आवश्यकता वाटली तर ते पुन्हा चौकशी करणार आहेत. त्यामुळे पालिकेने तेथे सकाळी आठ ते रात्री आठ अशा वेळेत चार अधिकारी, अग्निशमन दलाचे सहा जवान व एक बंब तेथे तैनात करण्यात आला आहे.

स्ट्रक्चरल ऑडिट करणारनाट्यगृहाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्यासाठी अल्प काळाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून या निविदा आज, सोमवारी उघडल्या जातील. त्यानंतर ठेकेदार निश्चित करून स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. जोपर्यंत हे ऑडिट होत नाही तोपर्यंत नाट्यगृहाची उभारणी कशी करायचे हे ठरणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग