शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरातील शालिनी स्टुडिओची जागा आरक्षीतच ठेवा, चित्रपट कलाकारांचा मनपावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 15:45 IST

शालिनी स्टुडिओची जागा अन्य कोणत्याही व्यवसायिक कारणासाठी वापरात न आणता या जागेवर केवळ स्टुडिओचेच आरक्षण ठेवण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देशालिनी स्टुडिओची जागा आरक्षीतच ठेवाचित्रपट कलाकारांचा मनपावर मोर्चा

कोल्हापूर : हिंदी-मराठी चित्रपटाची वैभवशाली परंपरेचा ज्वलंत इतिहास बनून गेलेल्या येथील शालिनी स्टुडिओची जागा अन्य कोणत्याही व्यवसायिक कारणासाठी वापरात न आणता या जागेवर केवळ स्टुडिओचेच आरक्षण ठेवण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात कलाकार, तंत्रज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चाच्यावतीने प्रभारी उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.

मध्यवर्ती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरवात झाली. मोर्चात यशवंत भालकर, रणजीत जाधव, शरद चव्हाण, सतीश रणदिवे, सुरेखा शाह, छाया सांगावकर, शोभा शिराळकर, शुभांगी पेंडसे, स्वप्नील राजशेखर, संजय मोहिते,अर्जुन नलावडे, आकाराम पाटील, श्रीकांत डिग्रजकर यांच्यासह अनेक कलाकार, तंत्रज्ञ सहभागी झाले.

मोर्चा महानगरपालिकेवर येताच तेथे जोरदार घोषणाबाजी झाली. घोडेबाजार करणाऱ्या कारभाऱ्यांना जतनाच धडा शिकवेल, कोल्हापूरची सांस्कृतिक परंपरा मातीत गाडणाऱ्या कारभारी नगरसेवकांचा धिक्कार असो, शालिनी स्टुडिओचे आरक्षण कामय राहिले पाहिजे, कारभारी नगरसेवक तुमचे करायचे काय, खाली डोके वर पाय असे उल्लेख असलेले फलक हातात घेतले होते.

मोर्चाच्यावतीने महापालिकेचे प्रभारी उपायुक्त मंगेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. चित्रपट निर्मिती कमी होऊ लागल्याने ४७ एकर जमीनीचे भुखंड पाडून व्यावसायिकीकरण करण्यात येऊ लागले आहे. तथापि चित्रपट कलाकार तंत्रज्ञांनी आंदोलनाचे अस्त्र उगारल्यानंतर १३ हजार ८८० चौरस मिटर व २० हजार चौरस मिटर असे दोन भुखंड शालिनी स्टुडिओसाठी आरक्षीत ठेवण्यात आले. परंतु या जागावरील आरक्षणही उठविण्याचा खटाटोप सुरु झाला आहे. ही जागा आरक्षीतच ठेवावी, ती अन्य कोणत्याही व्यवसायासाठी देऊ नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप