टोपमध्ये कायदा सुव्यवस्था राखा अन्यथा गुन्हे दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST2021-09-26T04:27:09+5:302021-09-26T04:27:09+5:30

: शिरोली : कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका, टोपमध्ये शांतता राखा अन्यथा कारवाई करू, असा इशारा ...

Keep law and order in the hat otherwise you will file charges | टोपमध्ये कायदा सुव्यवस्था राखा अन्यथा गुन्हे दाखल करणार

टोपमध्ये कायदा सुव्यवस्था राखा अन्यथा गुन्हे दाखल करणार

:

शिरोली :

कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका, टोपमध्ये शांतता राखा अन्यथा कारवाई करू, असा इशारा शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी टोप ग्रामस्थ आणि वडार समाजाला दिला. खांडवे यांनी शुक्रवारी शिरोली पोलीस ठाण्यात दोन्ही गटाची बैठक घेतली. टोपमध्ये सोमवारी (दि.२०) रोजी दगड उत्खननावरुन ग्रामस्थ आणि वडार समाजात वाद होऊन हाणामारी झाली होती. पण हा वाद आपापसात मिटला. पण, पुन्हा मंगळवारी गावात धुसफूस सुरू झाली. गुरुवारी ग्रामस्थांनी कल्लेश्वर मंदिरात बैठक घेतली तर शुक्रवारी वडार समाजाने बैठक घेऊन भूमिका मांडली. यानंतर राजेश खांडवे यांनी टोप मधील दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. गावात सर्वसामान्य लोक राहतात. त्यांना तुमचा कोणताही त्रास होता कामा नये. गावबंद, मुकमोर्चा, सोशल मीडियावर कोणतेही वादग्रस्त मेसेज टाकू नका अशा सूचना दिल्या. दोन्ही गटांनी एकत्र बसून मार्ग काढावा, असा सल्ला देत त्यांनी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास स्वतः फिर्यादी होऊन गुन्हे दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. या बैठकीला टोप पोलीस पाटील महादेव सुतार, शिवाजी पोवार, विठ्ठल पाटील, उदय गायकवाड, अविनाश कलकुटगी, बापू पोवार, रंगराव भोसले, सागर गायकवाड उपस्थित होते.

फोटो : २५ शिरोली बैठक

शिरोली पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या बैठकीत टोप मधील दोन्ही गटांना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Keep law and order in the hat otherwise you will file charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.