‘केशवराव’चे भाडे चार हजारपर्यंतच मर्यादित ठेवा

By Admin | Updated: March 18, 2016 00:39 IST2016-03-18T00:38:01+5:302016-03-18T00:39:55+5:30

नाट्यप्रेमींची मागणी : महापौरांची घेतली भेट; नूतनीकरणातील किरकोळ अडचणीवर वेधले लक्ष

Keep Keshavrao's fares limited to four thousand | ‘केशवराव’चे भाडे चार हजारपर्यंतच मर्यादित ठेवा

‘केशवराव’चे भाडे चार हजारपर्यंतच मर्यादित ठेवा

कोल्हापूर : महानगरपालिकेने नूतनीकरण केलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे भाडे रंगकर्मींना परवडेल असे चार हजार रुपयांपर्यंतच नाममात्र असावे, अशी विनंती कोल्हापुरातील नाट्यसंस्था, नाट्य वितरक, तंत्रज्ञ, कलाकारांनी गुरुवारी महापौर अश्विनी रामाणे यांना केली. नूतनीकरण करण्यात आल्यानंतरही काही किरकोळ अडचणी निदर्शनास आल्या असून, त्याकडेही या रंगकर्मींनी लक्ष वेधले.
कोल्हापुरातील रंगकर्मींनी महापौर रामाणे यांना एक निवेदनही दिले. संजय हळदीकर, संजय मोहिते, संतोष शिंदे, प्रफुल्ल महाजन, आनंद कुलकर्णी, किरण चव्हाण, अजय कुरणे, पप्पू गवस, अवधूत जोशी, युवराज घोरपडे, सुनील माने, ज्ञानेश मुळे, आदींचा महापौरांना भेटलेल्या शिष्टमंडळात समावेश होता.
नूतनीकरणानंतर नाट्यगृह खुले झाल्याने नाट्यसंस्थांना चांगल्या परिपूर्ण थिएटरची उपलब्धता झाली आहे. यापूर्वी चांगले नाट्यगृह नसल्याने पुणे, मुंबई व इतर शहरांतील नाट्यसंस्थांनी पाठ फिरविली होती. आता या नाट्यसंस्था कोल्हापूरकडे येण्याची आश्वासकता निर्माण झाली आहे, परंतु नाट्यगृहाचे भाडे हा फार महत्त्वाचा व कळीचा मुद्दा आहे. नाटककला ही सांस्कृतिक चळवळ म्हणून पाहिले पाहिजे. भाडे ठरविताना याचा विचार व्हावा. पुणे महानगरपालिकेच्या बालगंधर्व नाट्यगृहाचे भाडे ४५०० रुपये आहे. धनकवडी, कोथरुड, सातारा, इचलकरंजी येथील नाट्यगृहांचे भाडेही ४५०० रुपये आहे. कोल्हापुरात शाहू महाराजांनी कला जोपासली जावी म्हणून नाममात्र दरात नाट्यगृह उपलब्ध करून दिले होते. राज्यातील नाट्यगृहांचे भाडे आणि कोल्हापूरचा वारसा लक्षात घेऊन केशवराव भोसले नाट्यगृहाचे भाडेही चार हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात यावे, अशी विनंती निवेदनात करण्यात आली. नाट्यगृहात नाटक सादर करताना तंत्रज्ञ, कलाकारांच्या तसेच रसिकांच्या दृष्टीने काही सुधारणा होणे बाकी असल्याचेही रंगकर्मींनी नमूद केले.


हे बदल हवेत..
मेकअप रूममध्ये कपाट, हँँगर अडकविण्याची सुविधा
कपडे इस्त्री करण्यासाठी टेबल, बसण्यासाठी खुर्च्या
कलाकार व प्रेक्षकांना पिण्याच्या पाण्याची सोय
विंगेत कलाकारांना बसण्यासाठी खुर्च्या
प्रेक्षकांना बाहेर वेटिंग चेअर्स
तिकीट बुकिंगसाठी आॅफिस
एक्झिट लाईट प्रखरता
कमी करावी
नाट्यगृहाबाहेर स्लायडिंग
जाहिरात बोर्ड करा
नाट्यगृहाच्या स्वत:च्या लेवल (नेपथ्याचा भाग) असाव्यात


पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहाचे भाडे ४५०० रुपये आहे. धनकवडी, कोथरुड, सातारा, इचलकरंजी येथील नाट्यगृहांचे भाडेही ४५०० रुपये आहे. कोल्हापूरला शाहू महाराजांनी नाममात्र दरात नाट्यगृह उपलब्ध करून दिले होते.

Web Title: Keep Keshavrao's fares limited to four thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.