लाचखोर राष्ट्रवादीला दूर ठेवा

By Admin | Updated: October 22, 2015 00:51 IST2015-10-22T00:40:18+5:302015-10-22T00:51:44+5:30

महेश जाधव यांचे आवाहन : रामुगडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

Keep the bribe NCP away | लाचखोर राष्ट्रवादीला दूर ठेवा

लाचखोर राष्ट्रवादीला दूर ठेवा

कोल्हापूर : दहा वर्षांपासून शहराचा विकास रखडला आहे. राष्ट्रवादीने खतपाणी घातल्याने विकासकामांच्या नावाखाली ‘ढपला संस्कृती’ फोफावली आहे. कक्षात बसून राष्ट्रवादीच्या महापौरांनी लाच स्वीकारली आहे. अशा राष्ट्रवादीला या निवडणुकीतून हद्दपार करा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी बुधवारी केले.
येथील कळंबा फिल्टर हाऊस प्रभागाच्या उमेदवार शीतल सुभाष रामुगडे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, विकासकामांच्या गप्पा मारीत राष्ट्रवादीने स्वत:च्या तुंबड्या भरण्याचे काम केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हद्दपार करून भाजप-ताराराणी महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे. आमदार अमल महाडिक यांनी दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक प्रभाग पायाभूत सुविधांनी पूर्ण असावा, यावर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले.
यावेळी शीतल रामुगडे, सुभाष रामुगडे, शैलेश पाटील, अनिल कामत, यल्लाप्पा गाडीवडर, प्रशांत बरगे, के. आर. पाटील, विलास कुलकर्णी, मनोज नलावडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Keep the bribe NCP away