शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टी, हिप्परगीच्या विसर्गावर लक्ष ठेवा, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:50 IST

पूर येऊच नये अशा उपाययोजना करा

कोल्हापूर : मे महिन्यापासूनच ज्या पद्धतीने ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे, ते पाहता जिल्ह्यास महापुराचा धोका आहे. पावसाच्या प्रमाणात हिप्परगी बंधारा आणि अलमट्टीमधील पाण्याचा विसर्ग ठेवला तर हा धोका टळणार आहे त्यामुळे विसर्गावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा, त्यासाठी दोन्ही ठिकाणी निवृत्त नको तर सेवेत असलेल्या तज्ज्ञ अभियंत्यांची नियुक्ती करा. पूर आल्यानंतर पळापळ करण्याऐवजी तो येऊच नये यासाठीच्या उपाययोजना करा अशा सक्त सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक, अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, स्मिता माने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

आबिटकर म्हणाले, १५ ऑगस्टपर्यंत अलमट्टीतील पाणीसाठा ५१७ मीटर राहील आणि पावसाचा जोर वाढला की हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे खुले होतील या दोन्ही बाबींवर लक्ष ठेवले तरी पुराचा धोका कमी होणार आहे. राधानगरी, वारणा आणि कोयनेतील विसर्ग सुरू होत नाही तोपर्यंत धोका नाही.ढगफुटीसारखा पाऊस तासभर झाला तरी शहराचे तळे होते. या पुढेच असाच बेभरवशाचा पाऊस होणार हे गृहीत धरून धरण क्षेत्राबाहेर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी नालेसफाई करा, सखल भागात पाणी साठू नये याची काळजी घ्या.

धोकादायक ठिकाणी फलक, बॅरिकेड्सआमदार अमल महाडिक यांनी धोकादायक पूल, धबधब्यांच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत अशी सूचना केली. त्यावर मंत्री आबिटकर यांनी महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींनी अशा ठिकाणी सूचना फलक लावावेत, रस्त्यावर ओढ्यांचे पाणी आल्यावर तेथून कोणी जाणार नाही ही जबाबदारी यंत्रणेची असेल. जिल्हाधिकारी येडगे यांनी सर्व पुलांची तपासणी केली जाईल असे सांगितले.

तातडीने कन्सल्टंट नेमामंत्री आबिटकर पाच वर्षांपूर्वी भूस्खलनाने मृत्यू झालेल्या गावांमध्ये काय उपाययोजना केल्या यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कन्सल्टंट नेमण्यात येणार असल्याचे सांगितले. यावर आबिटकर यांनी पाच वर्षांत काहीच काम केले नाही, उद्या नागरिकांनी विचारले तर काय उत्तर द्यायचे. जोतिबा, पन्हाळ्यासह हा धोका असलेल्या गावांच्या अभ्यासासाठी तातडीने कन्सल्टंट नेमा, ठिकाणे शोधून तेथे निर्धारित वेळेत भूस्खलन सौम्यीकरणाच्या उपाययोजना करा असे सांगितले.