केदारी रेडेकर फौंडेशनची बाजी
By Admin | Updated: January 22, 2015 00:08 IST2015-01-22T00:07:50+5:302015-01-22T00:08:01+5:30
कबड्डी स्पर्धा : ५६ किलो वजनी गटात कलमेश्वर प्रथम

केदारी रेडेकर फौंडेशनची बाजी
नेसरी : सांबरे (ता. गडहिंग्लज) येथील कलमेश्वर क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या खुल्या कबड्डी स्पर्धेत महागाव (ता. गडहिंग्लज) येथील केदारी रेडेकर फौंडेशनने प्रथम क्रमांक पटकावीत ११ हजारांचे बक्षीस, तर ५६ किलो वजनी गटात सांबरेच्या कलमेश्वर संघाने प्रथम क्रमांकाचे सात हजारांचे बक्षीस पटकाविले.खुल्या गटात द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे शाहू ग्रुप सडोली खालसा (७००० रुपये), सुळगाव संघ (५००० रुपये), तर ५६ किलो वजनी गटात अनुक्रमे शिवशक्ती ग्रुप सरोळी (५००० रुपये), श्री रामलिंग ग्रुप माडवळे (३००० रुपये) व ३८ किलो वजनी गटात अनुक्रमे भोगावती कसबा तारळे (४००० रुपये), शट्टीहळ्ळी संघ (२००० रुपये) व बोलकेवाडी (१००० रुपये) या संघांनी बक्षीस पटकाविले.