के.डी.सी.सी. शाखा पुनाळमधील बँक निरीक्षक, शाखाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:31 IST2021-09-16T04:31:19+5:302021-09-16T04:31:19+5:30
याबाबतची फिर्याद आत्महत्या केलेल्या जय डवंग याचे वडील बाळू ऊर्फ बाळासाहेब भिवा डवंग (रा. माजनाळ, ...

के.डी.सी.सी. शाखा पुनाळमधील बँक निरीक्षक, शाखाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल
याबाबतची फिर्याद आत्महत्या केलेल्या जय डवंग याचे वडील बाळू ऊर्फ बाळासाहेब भिवा डवंग (रा. माजनाळ, ता. पन्हाळा) यांनी कळे पोलिसांत दिली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे : आत्महत्या केलेल्या जय बाळासाहेब डवंग (वय २३, रा. माजनाळ, ता. पन्हाळा ) यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाकडे डवंग डेअरी फर्म या व्यवसायासाठी रु. १० लाख इतक्या रकमचे कर्जप्रकरण दाखल केले होते. तीन महिन्यांपूर्वी आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचे प्रकरण मंजूर करण्यात आले होते; पण पुनाळ ( ता पन्हाळा) येथील के.डी.सी.सी. बँकेत कार्यरत असणारे बँक निरीक्षक राजेंद्र आनंदा बेलेकर व बँक शाखाधिकारी नामदेव गुंडा खोत हे गेले तीन महिने कर्ज प्रकरणाचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते. मंजूर कर्ज प्रकरणाचे पैसे मिळत नसल्याने जय तणावात होता. त्यातूनच त्याने २८ ऑगस्ट रोजी तणनाशक प्राशन करून त्याने जीवनयात्रा संपवून टाकली होती . त्यावेळी माजनाळ ग्रामस्थांच्या वतीने कळे पोलीस ठाण्यात एकत्र येऊन कर्जप्रकरण मंजूर असताना पैसे देण्यास विलंब करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदनही देण्यात आले होते.