शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

‘केडीसीसी’ निवडणुकीचे वाजले पडघम

By admin | Updated: October 19, 2014 00:45 IST

मतदारयादीचे काम सुरू : थकबाकीदार ९०० संस्था बाहेर

राजाराम लोंढे - कोल्हापूरकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या (केडीसीसी) निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. बँकेच्या प्रशासनाने आज, शनिवारपासून मतदारयादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. जानेवारीत निवडणुका घेण्याच्या हालचाली सहकार खात्यात सुरू झाल्या आहेत. घटना दुरुस्तीमुळे ९० दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी कर्ज थकीत असलेल्या संस्था प्रतिनिधी मतदानास अपात्र ठरणार आहेत. बिगरशेती संस्था २५७ व सुमारे साडेसहाशे विकास सेवा संस्था अशा ९०० संस्थांना मतदानच करता येणार नसल्याने दिग्गजांच्या दांड्या उडणार आहेत. निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील निवडणुकीस पात्र संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात ‘ड’ वर्ग संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार असून, टप्याटप्प्याने इतर संस्थांच्या निवडणुकाघेतल्या जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा बॅँक, ‘गोकुळ’सह अर्धा डझन साखर कारखान्यांच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा बॅँकेची मतदारयादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३१ आॅक्टोबर २०१४ च्या अर्हता दिनांकावर मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये सुधारणा अधिनियम क्रं. १६ व ३१ नुसार सुधारणा करण्यात आल्या आहेत. या अधिनियमातील तरतूदीनुसार बँकेचे सभासद मतदानापासून वंचित राहू नयेत म्हणून कलम २७(११)नुसार आज नोटीस प्रसिद्धीस देण्यात आली. ही निवडणूक नवीन पोटनियम दुरुस्तीनुसार होणार आहे. ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार थकबाकीदार संस्थांचे प्रतिनिधी मतदानास अपात्र ठरणार आहेत. ९० दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी थकबाकी असणाऱ्या संस्था प्रतिनिधींची नावे मतदारयादीतून वगळण्यात येणार आहेत. नेत्यांच्या कारनाम्यामुळेच जिल्हा बॅँक आर्थिक अरिष्टात सापडली आहे. परिणामी बॅँकेवर १३ नोव्हेंबर २००९ ला प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. गेली पाच वर्षे प्रशासकीय मंडळ थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करीत आहे; पण या नेत्यांनी बॅँकेला अक्षरश: झुलवत ठेवले आहे. नवीन नियमानुसारथकबाकीत सापडणाऱ्या २५७ बिगरशेतीच्या संस्था आहेत. यात जिल्ह्यातील बड्या धेंडांच्या संस्थांचा भरणा अधिक आहे. त्याचबरोबर जिल्हा बॅँकेच्या अर्थवाहिन्या असणाऱ्या विकास सेवा संस्थांचा समावेशही आहे.