राम मगदूम गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत गडहिंग्लज तालुक्यातील विकास सेवा संस्था गटात अपेक्षेप्रमाणे सत्तारूढ आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे विद्यमान संचालक संतोष तात्यासाहेब पाटील- कडलगेकर हे एकतर्फी विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी विरोधी आघाडीचे उमेदवार व बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांचा दारूण प्रभाव केला.एकूण १०६ पैकी संतोष पाटील यांना १०० मते मिळाली. तर विरोधी अप्पी यांना केवळ ६ मतांवर समाधान मानावे लागले.जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत टी. आर. पाटील यांचे चिरंजीव असणारे संतोष पाटील हे सलग दुसऱ्यांदा या गटातून बँकेवर गडहिंग्लज तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यापूर्वी त्यांचे वडील टी.आर.पाटील हे सलग ३ वेळा निवडून आले होते. त्यानंतर गेल्यावेळी आपल्या आजारपणामुळे त्यांनी चिरंजीव संतोष यांना चाल दिली होती. गेल्यावेळी झालेल्या चुरशीच्या तिरंगी सामन्यातही संतोष यांनीच बाजी मारली होती.
kdcc bank result : गडहिंग्लज तालुका सेवा संस्था गटात संतोष पाटलांचा अप्पींना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 11:53 IST