शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

kdcc bank election : सतेज पाटीलांची बिनविरोध निवड निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 17:55 IST

विधानपरिषदेनंतर आता जिल्हा बँकेतही मंत्री पाटील यांना बिनविरोध निवडून जाण्याची संधी मिळाली.

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. गगनबावडा तालुका विकास संस्था गटातून मंत्री पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच गटातून त्यांचेच समर्थक महादेव पडवळ (मांडुकली पैकी खोपडेवाडी) व दीपक लाड (पळसंबे) यांचेच डमी अर्ज असल्याने पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. त्यांचे विरोधक पी. जी. शिंदे यांनी या गटातील निवडणुकीपासून अलिप्त राहणे पसंत केल्याने पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानपरिषदेनंतर आता जिल्हा बँकेतही मंत्री पाटील यांना बिनविरोध निवडून जाण्याची संधी मिळाली.आज, शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मंत्री पाटील गटाचे समर्थक लक्ष ठेवून होते. पी. जी. शिंदे यांनी अर्ज दाखल न केल्याने मंत्री पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. महादेव पडवळ व दीपक लाड यांच्या माघारीची औपचारिकता राहिली आहे. पी. जी. शिंदे हे शुक्रवारी अर्ज दाखल करण्यास येणार असल्याची चर्चा दिसवभर सुरू होती. त्यातच ते स्वत: व त्यांचे बंधू एकनाथ शिंदे दिवसभर बँक आवारात थांबून होते. मात्र त्यांनी अर्ज दाखल केलाच नाही.गगनबावडा तालुका दुर्गम व वाड्या-वस्त्यांचा आहे. येथे संस्थांची संख्याही खूप कमी आहे. विकास संस्था गटात ६६ मतदार आहेत. एकवेळचा अपवाद वगळता या गटातून वीस वर्षे पी. जी. शिंदे प्रतिनिधीत्व करत आहेत. २००१ मध्ये सतेज पाटील यांनी या गटातून शिंदे यांचा पराभव करून बँकेच्या राजकारणात प्रवेश केला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील