राजर्षि शाहू विद्यानिकेतनचे सहायक शिक्षक कवडे सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:47+5:302021-07-07T04:31:47+5:30
कोल्हापूर : शिंगणापूर (ता. करवीर) येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनमधील सहायक शिक्षक संभाजी कवडे हे प्रदीर्घ सेवेनंतर ३० जूनला ...

राजर्षि शाहू विद्यानिकेतनचे सहायक शिक्षक कवडे सेवानिवृत्त
कोल्हापूर : शिंगणापूर (ता. करवीर) येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनमधील सहायक शिक्षक संभाजी कवडे हे प्रदीर्घ सेवेनंतर ३० जूनला सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी डी. एस. पोवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी आजरा पंचायत समितीचे माजी गट शिक्षणाधिकारी ए. बी. पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक एस. बी. चव्हाण, सहायक शिक्षक एस. के. मगदूम, के. डी. पोवार, पी. बी. आंबी आदी उपस्थित होते.
फोटो : ०६०७२०२१-कोल-शिंगणापूर
आेळी : शिंगणापुरातील राजर्षी शाहू विद्यानिकेतनमधील सहायक शिक्षक संभाजी कवडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी डी. एस. पोवार यांच्या हस्ते सपत्नीक गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.