शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एव्हरेस्ट चढाईला निघालेली ‘कस्तुरी’ही ‘महामॅरेथॉन’मध्ये धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 13:40 IST

हिमालयासह सह्याद्रीतील १३७ हून अधिक मोहिमा सर करणारी आणि २०२० च्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी निवड झालेली पहिली करवीरकर अठरा वर्षीय कस्तुरी सावेकर हीसुद्धा ‘ लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होऊन धावणार आहे.

ठळक मुद्देएव्हरेस्ट चढाईला निघालेली ‘कस्तुरी’ही ‘महामॅरेथॉन’मध्ये धावणारसह्याद्रीतील १३७ हून अधिक मोहिमा सर

कोल्हापूर : हिमालयासह सह्याद्रीतील १३७ हून अधिक मोहिमा सर करणारी आणि २०२० च्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी निवड झालेली पहिली करवीरकर अठरा वर्षीय कस्तुरी सावेकर हीसुद्धा ‘ लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होऊन धावणार आहे.वयाच्या तिसऱ्या वर्षापासून दऱ्याखोऱ्यांत फिरणाऱ्या कस्तुरीने आतापर्यंत गिर्यारोहणाच्या १३७ मोहिमा यशस्वीरीत्या सर केल्या आहेत. यात सह्याद्रीतील सर्वांत उच्च साल्हेर किल्ला, सालोटा, मोरामुल्हेर हरगड, हरिश्चंद्रगड, नळीची वाट, अवघड समजला जाणारा अलंग मदन कुलंग, हिमालयीन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट दार्जिलिंग येथील ११९२९ फूट उंचीचे संदकफू शिखर सर केले आहे.

याबरोबर तिने जून २०१८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट आॅफ माउंटेनिअरिंग व अलाईड स्पोर्टस, मनाली या संस्थेतून कोर्स पूर्ण केला आहे. यासाठी तिने १५ हजार ७०० फुटांवरील ‘क्षितीधार’ हा बेस कॅम्प पूर्ण केला आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये तिने ३५० फुटांवरील अवघड कातळधार धबधबाही रॅपलिंगद्वारे सर केला आहे.

सह्याद्रीच्या रांगेतील अत्युच्च शिखर कळसूबाई व हरिश्चंद्रगड हाही सर केला आहे. हजार फुटांवरील ‘लिंगाणा’ही सर केला आहे. अत्यंत कठीण समजली जाणारी २१ हजार २४६ फूट ‘माऊंट मेरा पीक मोहीम’ १२ दिवसांत पूर्ण केली आहे.

ऊर्जा देणारी महामॅरेथॉन‘लोकमत’ समूहातर्फे घेतली जाणारी महामॅरेथॉन सर्वच खेळांतील खेळाडूंना ऊर्जा देणारी आहे. ही मॅरेथॉन ही माझ्यासाठी खास मोहीमच आहे. त्यात मीही सहभागी होऊन धावणारच आहे. त्यामुळे तुम्हीही मागे न राहता सहभागी व्हावे.- कस्तुरी सावेकर, गिर्यारोहक

 

टॅग्स :Marathonमॅरेथॉनkolhapurकोल्हापूर