कसबा वाळवे मंडल अधिकारी विशांत भोसले लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:51+5:302021-06-16T04:33:51+5:30
कोल्हापूर : प्लॉटवर सातबारापत्रकी नोंदणीकरीता डायरीस मंजुरी देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथील मंडल ...

कसबा वाळवे मंडल अधिकारी विशांत भोसले लाच घेताना अटक
कोल्हापूर : प्लॉटवर सातबारापत्रकी नोंदणीकरीता डायरीस मंजुरी देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथील मंडल अधिका-यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विशांत विलास भोसले (वय ४९, रा. जुनी मोरे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही कारवाई शेळेवाडी (ता. राधानगरी) ग्रामपंचायत कायार्लयात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार रमेश आनंदा सावंत (रा. तुरंबे, ता. राधानगरी) याचा प्लॉट देणे-घेणेचा व्यवसाय आहे. त्यांनी विक्री केलेल्या प्लॉटचे ७/१२ पत्रकी नावनोंदणीकरीता डायरी मंजुरी होण्यासाठी दि.१२ जून रोजी मंडल अधिकारी विशांत भोसले याची भेट घेतली. त्यावेळी त्याने डायरी मंजुरीसाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती दोन हजारांची लाच देण्याचे ठरले. ही रक्कम शेळेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाश बुधवंत यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शेळेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचला, त्यावेळी दोन हजार रुपयेची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंडल अधिकारी विशांत भोसले याला रंगेहाथ पकडले, त्यांच्यावर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगोंडा, पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत व पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. सतीश मोरे, हवालदार अजय चव्हाण, शरद पोरे, सुनील घोसाळकर, रूपेश माने यांनी केली.
फोटो नं. १५०६२०२१-कोल-विशांत भोसले (आरोपी-एसीबी)
===Photopath===
150621\15kol_4_15062021_5.jpg
===Caption===
फोटो नं. १५०६२०२१-कोल-विशांत भोसले (आरोपी-एसीबी)