कसबा बावड्यात चाकु हल्ला, दोघे जखमी

By Admin | Updated: March 18, 2017 15:42 IST2017-03-18T15:42:09+5:302017-03-18T15:42:09+5:30

चाकु व विळ्याने केलेल्या हल्यात दोघेही गंभीर

Kasba Bawadya Chaku attack, both injured and injured | कसबा बावड्यात चाकु हल्ला, दोघे जखमी

कसबा बावड्यात चाकु हल्ला, दोघे जखमी

आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : शेत जमिनीला पाणी सोडण्यावरुन झालेल्या चाकु हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. मोहन शंकर चव्हाण (वय ४६ रा. पाटील गल्ली, कसबा बावडा), सर्जेराव शामराव ठाणेकर (६०, दोघे रा. मराठा कॉलनी, कसबा बावडा) अशी त्यांची नावे आहेत.
मोहन चव्हाण हे कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटीच्या पाणी योजनेवर चालक म्हणून नोकरीस आहेत. त्यांच्यात व सर्जेराव ठाणेकर यांच्यात पूर्वीपासून वाद आहे. ठाणेकर यांनी शनिवारी कोळी कॉलनी येथील शेतामध्ये पाणी सोडले होते. यावरुन त्यांच्यात व चव्हाण यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यामध्ये चाकु व विळ्याने केलेल्या हल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रविण चौगुले करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Kasba Bawadya Chaku attack, both injured and injured