पनोलोच्या अध्यक्षपदी कासार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST2021-08-01T04:22:33+5:302021-08-01T04:22:33+5:30
येथील श्री मौनी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या (पनोलो) अध्यक्षपदी जितेंद्र कासार यांची, तर उपाध्यक्षपदी रूपाली प्रताप पोवार यांची बिनविरोध ...

पनोलोच्या अध्यक्षपदी कासार
येथील श्री मौनी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या (पनोलो) अध्यक्षपदी जितेंद्र कासार यांची, तर उपाध्यक्षपदी रूपाली प्रताप पोवार यांची बिनविरोध निवड झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहायक निबंधक संभाजी पाटील होते.
यावेळी राहुल पाटील, संजय पाटील, बजरंग कडव, माधवी पोवार यांच्यासह सर्व संचालक मंडळ, कर्मचारी, सभासद उपस्थित होते. संस्थेची ६४ कोटी रुपयांची उलाढाल असून, २५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. वीस कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. संस्थेचे ३५० सभासद आहेत.
स्वागत गुरुनाथ कांबळे यांनी, तर आभार विक्रम भोसले यांनी मानले. नूतन पदाधिकाऱ्यांचे श्री मौनी विद्यापीठीचे अध्यक्ष पालकमंत्री सतेज पाटील, विश्वस्त संचालक डाॅ. आर. डी. बेलेकर यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो : जितेंद्र कासार, रूपाली पोवार