करवीरनिवासिनी अंबाबाई श्रूृंगेरी शारदाम्बा रुपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 16:54 IST2017-09-26T16:53:18+5:302017-09-26T16:54:08+5:30
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला (मंगळवारी) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची श्रूंगेरी शारदाम्बा रुपात पूजा बांधण्यात आली.

शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला (मंगळवारी) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची श्रूंगेरी शारदाम्बा रुपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा श्रीपूजक माधव मुनीश्वर व मकरंद मुनीश्वर यांनी बांधली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला (मंगळवारी) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची श्रूंगेरी शारदाम्बा रुपात पूजा बांधण्यात आली.
शंकराचार्य परंपरेत शारदाम्बेचे अनन्य साधारण महत्व आहे. शारदा म्हणजे सरस्वती. ही ज्ञानाची देवता. शंकराचार्यांनी प्रथमत: श्रूंगेरी क्षेत्राचे महत्व जाणून या देवतेची चंदनाची मूर्ती घडवून ती विद्यमान स्थानी श्रीचक्रावर स्थापन केली. कालांकराने परकीय आक्रमणात चंदनाच्या मूर्तीला क्षती पोहोचल्यावर सुवर्णविग्रह स्थापन करण्यात आला.
श्रृंगेरी शारदापीठ हे शंकराचार्य पीठांमध्ये दक्षिणाम्नायपीठ असून देवतेचे स्वरुप वरदहस्त, अक्षमाला, अमृतकुंभ आणि पुस्तक असे आहे. देवीच्या हातावर पोपट बसलेला असून तो ज्ञानाचे प्रतिक आहे. देवीच्या मस्तकावर चंद्रकोर आहे. ही पूजा श्रीपूजक माधव मुनीश्वर व मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.