करवीरची पीक परिस्थिती एकदम ‘झकास’

By Admin | Updated: August 22, 2014 22:05 IST2014-08-22T21:14:39+5:302014-08-22T22:05:14+5:30

भात पोटरीच्या अवस्थेत : सोयाबीन फुलाय लागलाय, भुईमुगाला सुटू लागल्या आऱ्या

Karveer's peak situation is 'flimsy' | करवीरची पीक परिस्थिती एकदम ‘झकास’

करवीरची पीक परिस्थिती एकदम ‘झकास’

कसबा बावडा : करवीर तालुक्यातील खरिपाची पिके जोमदार वाढीच्या अवस्थेत आहेत. धुळवाफेवर पेरलेले भात आता पोटरीला आले आहे. सोयाबीन फुलाय लागलाय. भुईमूग आऱ्या सुटणेच्या अवस्थेत आहे. उसाची उंची चांगलीच वाढली असून, पेरे हाताच्या मनगटासारखी झाली आहेत. एकंदरीत करवीरमधील पीक परिस्थिती इतर तालुक्यांच्या तुलनेत एकम ‘झकास’अशीच आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने उघडीप सर्वत्र दिल्याने शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. खरिपाची पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिकावर पाने खानाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. याचा परिणाम पिकाच्या वाढीवर होऊ लागला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी अशी परिस्थिती असताना करवीरची पीक परिस्थिती मात्र उत्तम राहिली आहे.
करवीर तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पिके चांगलीच वाढली आहेत. तसेच जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकाला पाऊस उघडला तरी पाण्याची गरज भासली नाही. तसेच कडकडीत पडलेल्या उन्हाचा पिकांच्या वाढण्यावर परिणाम झाला. याउलट इतर तालुक्यांतील स्थिती झाली. मुळातच पाऊस कमी पडल्याने व जमिनीतील ओलावा कमी झाल्याने व उन्हाचा तडाका वाढल्याने पिके कोमेजू लागली. मात्र, करवीर याला अपवाद ठरला. (प्रतिनिधी)

ओलावा टिकविण्यासाठी कोळपणी करा
सध्या अनेक तालुक्यांतील पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. हा ओलावा टिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी हलकी कोळपणी करावी व माती पिकाच्या मुळाशी लावावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

पावसाच्या उघडिपीने जमिनीतील ओलावा कमी होतो व उष्णता वाढते. त्यामुळे पिकांवर आळींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पिकांवर अशा प्रकारच्या आळ्या दिसल्यास ताबडतोब योग्य ती औषध फवारणी कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने करावी आणि पिके वाचवावीत.
- डी. बी. पाटील,
करवीर तालुका कृषी अधिकारी.

Web Title: Karveer's peak situation is 'flimsy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.