करवीर तालुक्याला निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:33+5:302021-07-14T04:27:33+5:30
हणमंतवाडी (ता. करवीर) येेेथे खासदार निधी स्थानिक विकास कार्यक्रम सन २०१९/२० अंतर्गत २० लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या न्यू ...

करवीर तालुक्याला निधी कमी पडू देणार नाही
हणमंतवाडी (ता. करवीर) येेेथे खासदार निधी स्थानिक विकास कार्यक्रम सन २०१९/२० अंतर्गत २० लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या न्यू शहाजी तालीम मंडळाच्या नूतन इमारत उद्घाटनप्रसंगी मंडलिक बोलत होते. या वेळी माजी आ. चंद्रदीप नरके, सरपंच संग्राम भापकर, अमर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी मंडलिक म्हणाले, करवीर तालुक्यातील गावांनी माझ्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. हणमंतवाडी गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे. चंद्रदीप नरके म्हणाले, युवकांमध्ये व्यायाम संस्कृती रुजली पाहिजे. यासाठी गावतालमी सशक्त करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. या वेळी अनिल चौगले, अमित पाटील, सरदार पिंजरे, बाळासाहेब रांगोळकर, मारुती निकम, संभाजी गडकरी, संजय निकम, अर्जुन पाटील, शहाजी निकम, प्रकाश शिंदे, सर्जेराव मोरे, बबन पानारी, अरविंद पानारी, सागर निकम उपस्थित होते.
फोटो
: १३ हणमंतवाडी तालीम
हणमंतवाडी (ता. करवीर) येथे न्यू शहाजी तालीम मंडळाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी आ. चंद्रदीप नरके, सरपंच संग्राम भापकर, अमर पाटील, पै. महादेव शिंदे उपस्थित होते.