शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

शाळा सुरू करण्यात करवीर, पन्हाळा, शिरोळ आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:02 PM

coronavirusunlock, school, educationsector, kolhapurnews शाळा सुरू करण्यात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत करवीर, पन्हाळा आणि शिरोळ तालुका आघाडीवर आहे. कोल्हापूर शहरातील ११२ पैकी अवघ्या १० शाळा भरल्या. विविध शाळांमध्ये पालकांची संमतीपत्रे देण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात अवघ्या दहा शाळा भरल्या संमतीपत्रे देण्याच्या प्रक्रियेला वेग

 कोल्हापूर : शाळा सुरू करण्यात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत करवीर, पन्हाळा आणि शिरोळ तालुका आघाडीवर आहे. कोल्हापूर शहरातील ११२ पैकी अवघ्या १० शाळा भरल्या. विविध शाळांमध्ये पालकांची संमतीपत्रे देण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे.ग्रामीण भागातील शाळांना शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तयारी करून सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. त्याला पालक, विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. करवीरमधील ५८, पन्हाळ्यातील ४६, तर शिरोळमधील ३३ शाळा सुरू झाल्या. या तुलनेत शहरातील शाळांना तयारी करूनही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. ज्या दहा शाळा सुरू झाल्या, त्यामध्ये एकूण २८९ विद्यार्थी उपस्थित होते. शाहूपुरीतील वि. स. खांडेकर प्रशालेत विद्यार्थी आले नाहीत.

काही पालक हे शाळा सुरू करण्याबाबतची चौकशी करून गेले. उषाराजे हायस्कूल आणि प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिक्षक उपस्थित होते; पण विद्यार्थी नव्हते. पालक हे संमतीपत्रे देण्यासाठी आले होते. सोमवार पेठेतील देशभूषण हायस्कूलमध्ये नववी आणि दहावीचे २० विद्यार्थी आले होते. बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी आले नाहीत.

शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झाली नसलेल्या शाळांनी विद्यार्थ्यांना कोणत्या दिवशी शाळेत यायचे याबाबत रविवारी कळविले आहे. दरम्यान, कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी शहरातील प्रायव्हेट हायस्कूल, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, आदी शाळांना भेट दिली. शाळा सुरू करण्याच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला.संमतीपत्रे देऊनही पालकांचा नकारपाल्यांना शाळेत पाठवून देत असल्याची संमतीपत्रे शाळांना दिली आहेत. मात्र, कोरोना संसर्गाची भीती असल्याने सोमवारी पहिल्या दिवशी अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवून देण्यास नकार दिला. काही पालकांनी शाळेने केलेल्या व्यवस्थेची पाहणी केली.

तालुकानिहाय आकडेवारी(शाळा सुरू,  विद्यार्थी  उपस्थिती)तालुका      शाळा       विद्यार्थी  संख्या

  • करवीर     ५८               २८२५
  • पन्हाळा    ४६              ३५३४
  • शिरोळ      ३३              १७६८
  • चंदगड      ३१              १५०८
  • कागल      ३१              १९७४
  • राधानगरी  २६            २०६२
  • भुदरगड     २१             १३२८
  • हातकणंगले  २१          १०७६
  • शाहूवाडी       २०           १०३८
  • गडहिंग्लज    १०            ४१०
  • गगनबावडा    ९             ५६२
  • आजरा          ५               १९५
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र