गेल्या एक महिन्यापासून सभापती धोत्रे यांच्या राजीनाम्याची चर्चा तालुक्यात रंगली होती. त्यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल संपल्याने त्या कधी राजीनामा देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर सोमवारी त्यांनी राजीनामा दिला. दरम्यान, नवीन सभापतींची निवड येत्या आठवडाभरात होणार असून, पालकमंत्री सतेज पाटील गटाच्या मीनाक्षी भगवान पाटील (कळंबा) व मंगल आनंदराव पाटील (नेर्ली) या दोघींपैकी एकास संधी मिळणार आहे.
फोटो: ०१ करवीर पंचायत समिती
करवीर पंचायत समितीच्या सभापती अश्विनी कृष्णा धोत्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे दिला. यावेळी उपसभापती सुनील पोवार, प्रदीप झांबरे, विजय भोसले, अर्चना खाडे, मीनाक्षी पाटील, शोभा राजमाने, कृष्णात धोत्रे, उर्मिला पाटील, आदी उपस्थित होते.