शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

Navratri : करवीर निवासिनी श्री अंबाबाई प्रत्यंगिरा देवी रुपात, बुधवारी नगरप्रदक्षिणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 16:30 IST

शारदीय नवरात्रौत्सवात सातव्या माळेला (मंगळवार) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रत्यंगिरा देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. बुधवारी अष्टमी असल्याने रात्री साडेनऊवाजता देवीची फुलांनी सजलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणा व त्यानंतर जागर होईल.

ठळक मुद्देकरवीर निवासिनी श्री  अंबाबाई प्रत्यंगिरा देवी रुपातअष्टमीनिमित्त बुधवारी वाहनातून नगरप्रदक्षिणा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात सातव्या माळेला (मंगळवार) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रत्यंगिरा देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. बुधवारी अष्टमी असल्याने रात्री साडेनऊवाजता देवीची फुलांनी सजलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणा व त्यानंतर जागर होईल.देवी उपासनेचा वार असल्याने मंगळवारी पहाटेपासूनच श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारच्या आरतीनंतर देवीची प्रत्यंगिरा रुपात पूजा बांधण्यात आली. शरभेश्वर शिवाची शक्ती असलेली ही देवी नारसिंही,अथर्वा, भद्रकाली या नावांनी ओळखली जाते.

अंगिरस म्हणजे काळ््या विद्येचे निराकरण करणारी म्हणून ती प्रत्यंगिरी. सिंहमुखी, सिंहावर आरुढ, त्रिशुल-डमरू-नाग आणि कपाल अथवा पानपात्र आणि गळ््यात लिंबांची माळ धारण करणारी, साक्षात अग्निस्वरुपा असे तिचे वर्णन आहे. शिवपुराणानुसार हिरण्यकश्यपाचे रक्त पिऊन उन्मत्त झालेल्या नरसिंह-विष्णूला शांत करणारी सिंहमुखी शरभेश्वर शिवाचा अवतार झाला.

शरभेश्वराला त्रास देण्यासाठी नरसिंहाने गंडभेरुंड आणि शरभशिवाला शांत करण्यासाठी पराशक्तीला नारसिंहीका प्रत्यंगिरा स्वरुप धारण करावे लागले आणि युद्धामध्ये समेट घडवून आणावा लागला. असा या प्रत्यंगिरा रुपाचा अन्वयार्थ आहे. ही पूजा सारंग मुनिश्वर, स्वानंद मुनिश्वर, माधव मुनिश्वर यांनी बांधली.दरम्यान बुधवारी अष्टमीचा जागर असल्याने रोजच्या पालखीऐवजी रात्री साडेनऊ वाजता श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती फुलांनी सजलेल्या वाहनातून भाविकांच्या भेटीसाठी नगरप्रदक्षिणेला निघेल. नगरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर रात्री बारानंतर महाकाली मंदिरासमोर देवीचा जागर होईल. गुरुवारी सकाळी साडे आठ नंतर मंदिर दर्शनासाठी खूले होईल.

 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर