शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकाचे पाण्यासाठी महाराष्ट्राला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 06:23 IST

यापूर्वीही उन्हाळ्यात कर्नाटकची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्राने वेळोवेळी या धरणातून पाणी सोडले आहे. गेल्यावर्षी उच्चांकी पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी असेल, अशी अपेक्षा होती.

- चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागताच उत्तर कर्नाटकातील सहा जिल्ह्यांत भीषण पाणीटंचाई भासू लागली आहे. तिला तोंड देण्यासाठी कोयना धरणातून तीन टीएमसी आणि उजनीमधून तीन टीएमसी असे सहा टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.यापूर्वीही उन्हाळ्यात कर्नाटकची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्राने वेळोवेळी या धरणातून पाणी सोडले आहे. गेल्यावर्षी उच्चांकी पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी असेल, अशी अपेक्षा होती. मात्र, मार्चच्या सुरुवातीपासूनच बेळगाव, विजापूर, बागलकोट, कलबुर्गी, यादगिरी आणि रायचूर जिल्ह्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. एप्रिलमध्ये ती तीव्र झाली. मे मध्ये ती आणखी भीषण होणार आहे. त्यामुळे महाराष्टÑ सरकारने मानवतावादी भूमिकेतून कोयना धरणातून ३ आणि उजनी धरणातून ३ असे सहा टीएमसी पाणी सोडावे. यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविता येईल तसेच जनावरेही जगवता येतील, असे येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.‘कोयना’मध्ये ४३ टीएमसी पाणीकोयना धरण सोमवार, दि. ११ रोजी ४२.७६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीपातळी २०९८.०६ फूट आहे. कोयनेच्या पायथा वीज गृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातील शिल्लक पाणीसाठा महिनाभर सहज पुरू शकतो. गेल्या वर्षी कोयना धरणात १२ मे रोजी अवघा ३१.०६ टीएमसी पाणी शिल्लक होते. तर उजनी धरणात ६४.५७ टीएमसी पाणीसाठ शिल्लक आहे.कर्नाटकसाठी ६ टीएमसी पाणी सोडण्याबाबत मुख्यमंत्री येदियुराप्पा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्राबाबत माहिती नाही. ती मिळाल्यावर धरणात शिल्लक पाणीसाठा किती आहे हे पाहून योग्य निर्णय घेतला जाईल.- जयंत पाटील, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री

टॅग्स :WaterपाणीKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र